आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 01:29 PM2022-02-26T13:29:42+5:302022-02-26T13:33:13+5:30

अमेरिका या युद्धाचा (Russia-Ukraine War) भाग झाला असता तर चित्र वेगळं असलं असतं. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, रशिया अमेरिकेचा सामना करू शकला असता का? दोन्ही देशांपैकी कुणाची सेना जास्त शक्तिशाली आहे?

Top 10 country Which has a most powerful military, Know where India stands | आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

googlenewsNext

शक्तिशाली रशियाने यूक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine War) केला आणि असं मानलं जात आहे की, काही तासांमध्ये पूर्ण यूक्रेनवर ताबा मिळवला जाईल. या लढाईत अमेरिका आणि काही इतर देश यूक्रेनच्या बाजूने सहभागी होती अशी आशा होती पण त्यांनी शेवटच्या क्षणी हात वर केले. जर अमेरिका या युद्धाचा भाग झाला असता तर चित्र वेगळं असलं असतं. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, रशिया अमेरिकेचा सामना करू शकला असता का? दोन्ही देशांपैकी कुणाची सेना जास्त शक्तिशाली आहे?

कोण आहे नंबर वन?

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, रशियाकडे जगातली दुसरी सर्वात शक्तिशाली सेना आहे. तर अमेरिका याबाबतीत नंबर वन आहे. रिपोर्टमध्ये Global Firepower द्वारे जारी आकडेवारीचा हवाला देत सांगण्यात आलं की, अमेरिकेची सेना जगात सर्वात शक्तिशाली आहे. Global Firepower ने एक यादी तयार केली आहे.  ज्यात देशांना त्यांच्या सैन्य शक्तीच्या आधारावर रॅंक केलं गेलं आहे.

५० गोष्टींच्या आधारावर मिळाली रॅंकिंग

ही रॅंकिंग तयार करण्यासाठी ५० फॅक्टर्स डोळ्यांसमोर ठेवण्यात आलेत. या पावर इंडेक्समध्ये अमेरिका ०.०४५३ स्कोरसोबत पहिल्या स्थानावर आहे. याचं कारण अमेरिकेचं ७०० बिलियन डॉलरचं सुरक्षा बजेट आहे. तर दुसऱ्या स्थानावर रशिया आहे. रशियाचा स्कोर ०.०५०१ इतका आहे. रशियाकडे साधारण ९००, ००० सैनिक आहेत. चीनबाबत सांगायचं तर या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या सैनिकांची संख्या २ मिलियनच्या जवळपास आहे.

यूक्रेनचं स्थान काय?

ब्रिटनचा नंबर या यादीत भारत आणि फ्रान्सनंतर येतो. ब्रिटनला ८व्या नंबरवर ठेवण्यात आलं आहे. ब्राझीलला टॉप १० देशांमध्ये जागा मिळाली आहे. पण रशियाचा सामना करत असलेल्या यूक्रेनला टॉप २० मध्येही जागा नाही. यावरून हे लक्षात येतं की, यूक्रेनला अमेरिका आणि नाटोची किती गरज आहे. यूक्रेन २२व्या नंबरवर आहे. 

शक्तिशाली सेना असणारे टॉप १० देश

१) अमेरिका - ०.०४५३

२) रशिया - ०.०५०१

३) चीन - ०.०५११

४) भारत - ०.०९७९

५) जपान - ०.११९५

६) दक्षिण कोरिया - ०.११९५

७) फ्रान्स - ०.१२८३ 

८) ब्रिटन - ०.१३८२

९) पाकिस्तान - ०.१५७२

१०) ब्राजील - ०.१६९५
 

Web Title: Top 10 country Which has a most powerful military, Know where India stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.