World's Longest Flight Route: आजकाल विमानाचा प्रवास काही नवीन राहिलेला नाही. लाखो लोक कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विमानाने प्रवास करतात. सामान्यपणे सगळ्यांना माहीत आहे की, 2 ते 3 तासात एका देशातून दुसऱ्या देशातही विमानाने पोहोचता येतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, विमानाचा सगळ्यात जास्त लांब पल्ल्याचा प्रवास किती तासांचा आहे? आज आम्ही तुम्हाला विमानाच्या सगळ्यात लांब प्रवासाबाबत सांगणार आहोत.
18 तासांचा विमान प्रवास
सिंगापूर एअरलाइन्सही ही फ्लाइट सिंगापूर ते न्यूयार्क दरम्यान उडते. या दोन्ही शहरांमधील अंतर 15 हजार 344 किमी इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी विमानाला 18 तास 45 मिनिटांचा वेळ लागतो. इतका वेळ लोक फ्लाइटमध्येच बसून असतात.
सिंगापूर- लॉस एंजिल्स फ्लाइट
न्यूयार्क रूटनंतर सिंगापूरहून लॉस एंजलिस दरम्यान एक फ्लाइट उडते. या दोन्ही शहरांमधील अंतर 14 हजार 115 किमीचं आहे. जे पार करण्यासाठी यूनायटेड एअरलाइन्सला 17 तास 55 मिनिटांचा वेळ लागतो. हा जगातला दुसरा सगळ्यात लांबचा विमान प्रवास आहे.
दोहा-ऑकलॅंड
जगातला तिसरा सगळ्यात लांब विमान प्रवास म्हणजे न्यूझीलॅंडच्या ऑकलॅंड आणि दोहाच्या कतार शहरादरम्यानचा आहे. कतार एअरवेजची ही फ्लाइट 14 हजार 535 किमीचं अंतर 17 तास 40 मिनिटात पार करते.
पर्थ- लंडन फ्लाइट
ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातून लंडन दरम्यानचं अंतर 14 हजार 498 किमीचं आहे. क्वांटास एअरवेज फ्लाइट या दोन्ही शहरादरम्यान उडते. हे अंतर पार करण्यासाठी फ्लाइटला 17 तास 20 मिनिटांचा वेळ लागतो.
ऑकलॅंड- अमीरात फ्लाइट
संयुक्त अरब अमीरातच्या दुबई आणि न्यूझीलॅंडच्या ऑकलॅंडचं अंतर साधारण 14 हजार 193 किमीचं आहे. हे अंतर पार करण्यासाठी फ्लाइटला साधारण 17 तास 5 मिनिटांचा वेळ लागतो.