Black Horse Fraud : आजकाल मार्केटमधूनही काहीही खरेदी करायचं असेल तर काळजीपूर्वक खरेदी करावी लागते. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची फसवणुकही होऊ शकते. पंजाबमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अशीच फसवणूक झाली आहे. ज्यामुळे त्याला आता पश्चाताप होत आहे. या व्यक्तीने साधारण २३ लाख रूपये देऊन एका व्यापाऱ्याकडून काळ्या रंगाचा घोडा खरेदी केला होता. पण जसा तो घोड्याला घरी घेऊन आला आणि त्याची आंघोळ घातली तसा घोड्याचा रंग लाल झाला.
घोडा गर्द काळ्या रंगाचं असणं फार दुर्मीळ असतं. काळ्या रंगाच्या घोड्यांची किंमत जास्त असते. इतर रंगांचे किंवा मिक्स कलरचे घोडे काळ्या रंगाच्या घोड्यांच्या तुलनेत स्वस्त मिळतात. काळे घोडे खरेदी करण्याची आवड पंजाबच्या रमेश कुमार यांना महागड पडली. रमेश यांनी २३ लाख एक काळ्या रंगाचा घोडा खरेदी केला आणि तो घेऊन घरी आले. पण त्याना हे माहीत नव्हतं की, त्यांची फसवणूक झाली.
पंजाबच्या सुनाम शहरातील संगरूरमध्ये राहणारे रमेश कुमार यांनी एका व्यापाऱ्याकडून घोडा खरेदी केला होता. या सौद्यात तीन लोक सहभागी होते. तिघांनी मिळून २३ लाख रमेश कुमार यांना काळा घोडा विकला होता. पण रमेश कुमार यांना काही समजलं नाही. ते घोडा घेऊन घरी आले आणि रमेश यांनी घोड्याला आंघोळ घातली. आंघोळ घालताच त्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं.
या खरेदीत रमेश यांनी व्यापाऱ्यांना ७ लाख ६० हजार रूपये कॅश दिली होती. बाकी रकमेचे दोन चेक त्यांना रमेश यांनी दिले होते. एकूण २३ लाख रूपयांचं पेमेंट व्यापाऱ्यांना करण्यात आलं होतं. आता रमेश कुमार यांनी तिन्ही व्यापाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.