सामान्यपणे एखादं घर तयार करण्यासाठी सिमेंट, दगड, वाळू आणि लोखंडी सळ्यांचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी आपण प्लॅस्टिकच्या बॉटल्सपासून एक घर तयार केल्याचंही वाचलं होतं. पण आता अनोखी इमारत चर्चेचा विषय ठरत आहे. या इमारतीचे पिलर सोडून यासाठी पूर्णपणे लाकडाचा वापर करण्यात आला आहे. २४ मजली या इमारतीची उंची ९९.९ मीटर आहे. लाकडाचा वापर करून एवढी मोठी इमारत उभी करणं खरंच अनोखं काम मानलं जात आहे.
पूर्णपणे इकोफ्रेन्डली या लाकडाच्या इमारतीमध्ये १५० पेक्षा अधिक खोल्या तयार केल्या आहेत. इमारतीच्या मजबूतीसाठी देवदार लाकडांचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीच्या भिंतीपासून ते छतापर्यंत केवळ लाकडाचा वापर करण्यात आला आहे.
चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरात तयार केलेली ही इमारत सध्या तरी रिकामीच आहे. मात्र, पर्यटकांना बघण्यासाठी ही इमारत खुली करण्यात आली आहे. ही इमारत बघण्यासाठी दूरदूरून पर्यटक येत आहेत.
(Image Credit : china.org.cn)
लाकडापासून तयार केलेल्या या इमारतीचं निर्माण आर्किटेक्ट सुइ हॅंग यांनी केलंय. सुइ हॅंग यांच्यानुसार, ही इमारत तयार करण्यासाठी त्यांनी २ वर्षांचा कालावधी लागला. तर या इमारतीचं डिझाइन तीन वर्षांआधीच तयार केलं होतं. पण याची रूपरेषा आखण्यासाठीच साधारण १ वर्षांपेक्षा अधिक वेळ लागला.