Trending Video: आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. काहीजण मजेशीर व्हिडिओ शेअर करतात, तर काहीजण आपला जीव धोक्यात घालतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात सेल्फी काढण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.
ज्वालामुखीचे तापमान 1000 डिग्री सेल्सियसव्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीजण फोटो घेण्यासाठी धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडाजवळ गेल्याचे दिसत आहे. धगधगत्या ज्वालामुखीचे तापमान 1000 डिग्री सेल्सियस तर त्याच्या बाहेरील बाजुचे तापमान 500 डिग्री सेल्सियसपर्यं असू शकते. हा लावा एखाद्याच्या अंगावर पडला, तर त्याच्या शरीराचे काय होईल..? विचारही करवत नाही. पण, अशा परिस्थितीत काहीजण आपला जीव धोक्यात घालून ज्वालामुखीच्या तोंडापाशी जाण्याचा प्रयत्न करतात.
फोटा काढण्यासाठी धोक्यात घातला जीव:-
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ज्वालामुखी धगधगतोय आणि त्यातून मोठ्याप्रमाणात लावा बाहेर पडतोय. पण, अशा स्थितीत फोटो काढण्यासाठी तिथे लोकांची गर्दी जमली आहे. व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे या व्हिडिओवरुन दिसून येते. इंस्टाग्रामवर viralhog नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मूर्खपणाची हद्द...व्हिडिओसोदत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ज्वालामुखीच्या खुपच जवळ गेला नाहीत का..’ हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, ‘पृथ्वीवर माणसापेक्षा मूर्ख कोणी नाही.’ दुसऱ्या एकाने लिहिले, ‘ही मूर्खपणाचे हद्द आहे.’ तिसऱ्या एकाने लिहिले, ‘सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात.’