(Image Credit- Getty)
कोणताही जीव पृथ्वीवरून नाहीसा झाल्यानंतर पुन्हा कसा दिसू शकतो? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या तस्मनियामध्ये लोकांना असा प्राणी दिसला आहे जो तब्बल ८५ वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नाहिसा झाला होता. या प्राण्याचे अर्धे शरीर कुत्र्यासारखे तर अर्धे वाघासारखे आहे. या प्राण्याला तस्मानिया टायगर असं म्हणतात.
तस्मानिया टायगर ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया परिसरात दिसला. १९३६ मध्ये हा प्राणी लुप्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या थायलासीनमधील अवेअरनेस ग्रुपचे प्रसिडेंट नील वाटर्स यांनी तस्मानिया टायगर दिसल्याचा खुलासा केला आहे. या प्राण्याचे फोटोसुद्धा त्यांनी कॅमेरात कैद केले आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे चार फोटो असे आहेत. ज्यात तस्मानिया टायगरचे पूर्ण कुटुंब आहे. या खुलाश्यानंतर वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नील यांचे हे फोटो चुकीचे असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे ओळखण्यात चूक झाली. मनोवैज्ञानिक हा खोट्या प्रचाराचा मार्ग असल्याचं सांगत आहेत. २००५ मध्येही WWF च्या कॅमेरात रहस्यमय मासांहारी, उडणारी खारूताई कैद झाली होती. खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ
असं मानलं जातं की, तस्मानियन टायगर २० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर आला होता. १९३० ला शेवटचा तस्मानिया टायगर जीवंत स्थितीत आढळला. त्यानंतर हा प्राणी कधीही दिसला नाही. वयस्कर तस्मानिया टायगर ३९ ते ५१ इंच लांब असतो. याचे वजन १२ ते २२ किलोग्राम असते. त्याची उंची २० ते २६ फुटांपर्यंत असते. हा एक मांसाहारी प्राणी असून झा़डांमध्ये आपला निवारा तयार करतो. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......