(Image Credit : thenational.ae)
भारतात व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मृतदेह एकतर जाळला जातो नाही तर दफन केला जातो. पण जगात एक अशाही काही आदिवासी जमाती आहेत ज्या मृतदेह अर्धवट जाळून पुन्हा त्याला घरात घेऊन येतात. नंतर हे मृतदेह ममीच्या रूपात सांभाळून ठेवले जातात. ही अनोखी प्रथा पपुआ न्यू गिनीतील 'दानी' जमातीत केली अजूनही सुरू आहे.
(Image Credit : dailystar.co.uk)
या जमातीतील लोक त्यांच्या परिवारातील कुणाचं निधन झालं तर त्यांचं शरीर अग्नी देण्यासाठी घेऊन जातात. नंतर अर्ध जळालेला मृतदेह ते घरी परत घेऊन येतात. जेणेकरून त्या व्यक्तीच्या आठवणी तशाच ठेवता येतील. या ममी सांभाळून ठेवण्यासाठी हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करतात.
(Image Credit : dailymail.co.uk)
इंडोनेशियातील ही आदिवासी जमात आजही अशाप्रकारे नातेवाईकांचे ममी सांभाळून घरात ठेवतात. या लोकांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. लोकांच्या घरात अंदाजे २५० वर्षांहून अधिक जुने ममी ठेवले आहेत. तसेच त्यांना त्यांची ही प्रथा अशीच कायम सुरू ठेवायची आहे. प्राण्यांमधील तेलाने आणि धुराच्या मदतीने हे ममी संरक्षित केले जातात.
या जमातीतील पुढील पिढ्यांनाही या गोष्टी माहीत असाव्यात म्हणून त्यांचे अजूनही प्रयत्न सुरू असतात. वर्षानुवर्षे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे घरातील ममीचा सांभाळ करण्याची जबाबदारी दिली जाते. इंडोनेशियातील ज्या भागात हे लोक राहतात तो इंडोनेशियातील सर्वात मागास भाग मानला जातो. पण तरीही या लोकांनी त्यांची संस्कृती जपून ठेवली आहे. अनेक पर्यटक त्यांची संस्कृती बघण्यासाठी त्यांना भेट देत असतात.