Weird Tradition : लग्नाबाबत जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. एकट्या भारतातच लग्नासंबंधी शेकडो रितीरिवाज बघायला मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या एका अशा परंपरेबाबत सांगणार आहोत, जी जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल.
डेली मेलच्या एका वृत्तानुसार, पश्चिम आफ्रिकेत एक असा समाज आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरुन आणावी लागते. या रिवाजामुळे येथील लोक एकमेकांच्या पत्नी चोरुन लग्न करतात. या अनोख्या रिवाजाबाबत जाणून घेऊ आणखी काही.
पश्चिम आफ्रिकेच्या वोदाब्बे जमातीत लोक एकमेकांच्या पत्नींना चोरुन आणून लग्न करतात. अशाप्रकारचं लग्न या जमातीच्या लोकांची ओळख आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या लोकांमध्ये ही परंपरा सुरु आहे.
असे सांगितले जाते की, या समाजातील लोकांचं पहिलं लग्न कुटुंबातील लोकांच्या सहमतीने केलं जातं. पण दुसरं लग्न करायचा रिवाज फारच वेगळा आहे. या समाजात दुसऱ्या लग्नासाठी दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरुन आणणे गरजेचे आहे. जर असं करु शकत नसाल तर तुम्हाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही.
या समाजातील लोकांमध्ये दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. या आयोजनादरम्यान मुलं साज करुन चेहऱ्यावर रंग लावून असतात. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डान्स आणि वेगवेगळ्या गोष्टी करुन दुसऱ्यांच्या पत्नींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण यादरम्यान काळजी घ्यावी लागते की, त्या महिलेच्या पतीला याची माहिती होऊ नये. त्यानंतर जर एखादी महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जात असेल तर तेव्हा या समुदायातील लोक दोघांना शोधून त्यांचं लग्न लावून देतात. या दुसऱ्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणूण स्विकारलं जातं.