'जसं दिसतं तसं नसतं' हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो किंवा नेहमी वापरतो. असंच काहीसं एक प्रकरण सध्या सोशल मीडियात गाजत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो एका लग्न समारंभाचे आहेत. ज्यात एक लहान मुलगा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीसोबत लग्न करत आहे. आणि दोघांनी वेडींग किसही केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, हे एका अरेंन्ज मॅरेजचे फोटो आहेत आणि प्रकरण बालविवाह व चाइल्ड ट्रॅफिकींगचं आहे. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वजण भावूक झाले.
नेमकं काय आहे प्रकरण?
ही घटना आहे मेक्सिकोमधील. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फोटो लग्नातील आहेत. पण हे प्रकरण बालविवाह किंवा चाइल्ड ट्रॅफिकींगचं नाहीये. फोटो दिसत असलेला नवरदेव भलेही तुम्हाला १० वर्षांचा लहान मुलगा वाटत असेल, पण मुळात त्याचं वय १९ आहे. तो एका डिसऑर्डरने पीडित आहे.
जोनाथन असं या तरूणाचं नाव असून तो मेक्सिकोच्या Xaltianguis शहरात राहणारा आहे. आजारामुळे जोनाथनच्या शरीराचा विकास हळुवार होत आहे. त्यामुळेच तो त्याच्या वयापेक्षा लहान वाटतो.
असं असलं तरी जोनाथनला त्याच्याचं वयाच्याच मुलीकडून प्रेम मिळालं. त्याने नुकतच त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केलं. परिवारातील लोक आणि मित्रांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. त्याचं लग्न ४ मे रोजी झालं. दुसऱ्या दिवशी Esto Es Guerrero नावाच्या फेसबुक पेजवर त्याचे फोटो समोर आले. या पेजवर जोनाथनच्या समस्येचा सविस्तर उल्लेख केला आहे. पण केवळ त्याचे फोटो व्हायरल झाले, त्याच्याबद्दल माहिती कुणी वाचली नाही. आणि लोक वेगवेगळे अर्थ काढू लागले.
म्हणजे हे की, जोनाथनचं अरेन्ज मॅरेज नाहीये, त्याने लव्ह मॅरेज केलंय. यावर जोनाथन म्हणाला की, 'मला प्रेम आणि मला आनंद आहे की, माझी सर्वात चांगली मैत्रिण माझी जीवनसाथी झाली'.