Weird Traditions Around the World: जगभरातील जास्तीत जास्त देशांमध्ये महिलांसाठी वेगवेगळे कायदे बनवले जातात. पण सत्य स्थिती ही आहे की, विकसित असो वा अविकसित देशांमध्ये महिलांची स्थिती वाईट आहे. कारण त्यांना मनासारखं स्वातंत्र्य दिलं जात नाही. पण कधी कधी असं वाटतं की, विकसित झालेल्या समाजाच्या तुलनेत मागासलेला समाज अधिक चांगला आहे. आफ्रिकेतील एक मुस्लिम समाज याचं उदाहारण आहे. या समाजात पुरूषांपेक्षा महिलांना अधिक जास्त दर्जा दिला जातो. यामुळेच या समाजाची खूप चर्चा होते.
या जमातीचं नाव आहे टुआरेग (Tuareg tribe Africa). ही सहारा वाळवंटात रहाणारी एक बंजार जमात आहे जी उत्तर आफ्रिकेच्या माली, नायगर, लिबिया, एल्जीरिया आणि कॅडसारख्या देशांमध्ये राहते. 2011 च्या एका रिपोर्टनुसार यांची संख्या 20 लाखाच्या जवळपास आहे. ही एक मुस्लिम जमात आहे. पण यांचे रितीरिवाज मुस्लिम समाजाच्या फार वेगळे आहेत.
पुरूष घालतात बुर्क़ा
या जमातीची खासियत म्हणजे इथे महिला नाही तर पुरूष बुर्क़ा घालतात. पुरूष निळ्या रंगाचा बुर्क़ा घालतात. याचं कारण हे आहे की, त्यांना नेहमीच वाळवंटातून प्रवास करावा लागतो. अशात ते यापासून स्वत:ला वाळू आणि उन्हापासून वाचवतात.
‘Henrietta Butler’ नावाच्या एका फोटोग्राफरने एकदा या जमातीतील लोकांना विचारलं होतं की, पुरूष बुर्क़ा का घालतात आणि महिला का नाही? यावर तिला उत्तर मिळालं होतं की, महिला सुंदर असतात, पुरूषांना त्यांचा चेहरा नेहमी बघायचा असतो.
महिला असतात मुख्य
या जमातीबाबत आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे इथे महिलांना परिवारातील मुख्य मानलं जातं. जेव्हा पतीपासून त्यांचा घटस्फोट होतो तेव्हा त्या सगळी संपत्ती त्यांच्याकडे ठेवू शकतात. इतकंच नाही तर महिलांना लग्न झाल्यावरही अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवण्याची परवानगी असते. लग्नाआधी आणि नंतर त्यांचे प्रियकर असू शकतात.
या जमातीमध्ये घटस्फोटाला वाईट मानलं जात नाही. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, घटस्फोटानंतर पत्नीच्या घरातील लोक जल्लोष करतात. वुमेन प्लानेट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, टुआरेग जमातीतील लोक फार स्वाभिमानी असतात. जर त्यांना पाण्यासाठी विचारलं गेलं नाही तर ते स्वत:हून विचारत नाहीत. मग त्यांना कितीही तहान लागलेली असेल तरीही. तसेच एका प्रथेनुसार पुरूष त्या महिलांसमोर जेवण करू शकत नाहीत ज्यांच्यासोबत ते संबंध ठेवू शकत नाहीत.