लहानपणी शिकवेलली कासव-सश्याची गोष्ट तुम्हाला चांगलीच आठवत असेल. हळुहळु चालून त्याने चपळ पण आळशी सश्याला हरवलं होतं. इंग्लडमध्ये पण कासवाचा असाच एक किस्सा माध्यमांमध्ये पसरला आहे.
एका कासवाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क १० किमी अंतर कापल्याचं समोर आलं आहे. केवळ २४ तासात त्याने हा १० किमीचं अंतर पार केलं. या कासवाचं वय जवळपास ७० वर्ष आहे. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी त्याने आपलं घर सोडलं. त्या घरात तो ५० वर्षांपासून आपल्या मालकिणीसोबत राहत होता. आपल्या प्रेयसीला तो बऱ्याच वर्षात भेटला नसावा म्हणून त्याने घरात कोणी नसताना पळ काढला आणि थेट प्रेयसीच्या प्राणीसंग्रहालयात गेला. या कासवाचं नाव आहे फ्रेडी आणि त्याच्या प्रेयसीचं नाव आहे एस्ट्रिड.
घरात आपला कासव नसल्याचं त्याची मालकिन स्टेंशन हिच्या लक्षात आल्यावर तिने आसपास बरीच शोधाशोध केली. तरीही त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी फेसबुकवर आपल्या कासवाविषयी माहिती दिली. काही वेळातच ती माहिती सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आणि एस्ट्रीडच्या मालकिणीपर्यंत पोहोचली. त्यांनी लगेच स्टेंशनशी संपर्क साधून फ्रेडी आपल्याकडे असल्याचं सांगितलं. या काळात एस्ट्रिड आणि फ्रेडी एका घरात राहत होते.
तेथील प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की बराच वेळ आपल्या प्रियजनांपासून लांब राहत असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटला नव्हता, तिच्यासाठी तो व्याकूळ झाला होता. म्हणून त्याने घरातून पळत १० किमीचा प्रवास २४ तासात केला.
फोटो सौजन्य : www.thesun.co.uk