जुळ्या मुलांबाबत तुम्ही अनेकदा अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला दोन जुळ्या बहिणींची अनोखी कहाणी सांगणार आहोत. Twinsburg, Ohio राहणाऱ्या ३२ वर्षीय ब्रिटनी आणि ब्रायना नावाच्या जुळ्या बहिणींच एक स्वप्न होतं. ते म्हणजे लग्न करायचं तर जुळ्या भावांसोबत. आश्चर्याची बाब म्हणजे दोघींचं स्वप्न पूर्णही झालं.
गेल्या शनिवारी 2018 Twins Days Festival मध्ये या जुळ्या बहिणींनी जॉश आणि जेरेमी नावाच्या जुळ्या भावांसोबत लग्न केले. बहीणींनी सांगितले की, हे आमच्यासाठी बिल्कुल पऱ्यांच्या कथेप्रमाणे होतं. जुळ्या भावांसोबत लग्न करणं आमच्यासाठी महत्वपूर्ण होतं. एक वेळ आम्हाला असं वाटलं होतं की, आम्हाला लग्नासाठी जुळे भाऊ मिळणार नाहीत.
ब्रिटनीने सांगितले की, आम्हाला लग्नासाठी जुळे मुलं मिळणं कठिण झालं होतं. तर ब्रायना म्हणाली की, आम्ही दोघी बहिणी एकमेकांना दोन शरीर एक जीव समजतो. आम्ही बालपणापासून सगळ्याच गोष्टी एकसारख्या केल्या आहेत. एकसारखे कपडे परिधान करायचो, डबल डेट करत होतो. त्यामुळे आम्हाला लग्न करणं तसं सोपं वाटत होतं.
इतकेच नाही तर लग्नाबाबत दोन्ही बहीणीचे विचार एकसारखे होते. दुसरीकडे त्यांच्या पतींचं म्हणनं आहे की,ते सुद्धा जुळ्या बहीणींसोबत लग्न करण्याचं स्वप्न बघत होते. इतकेच नाही तर जुळ्या मुली मिळाल्या नसत्या तर आम्ही लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं.
या मजेदार कहाणीची आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे ज्या भावांनी या जोड्यांचं लग्न लावलं तेही जुळे भाऊ आहेत. आता या कपल्सना टेक्निकचा वापर करुन मुलंही जुळीच जन्माला घालयची आहेत. चला या दोघांनाही आमच्याकडून शुभेच्छा!