बंगळुरू - पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी साचणं हे नेहमीचं झालं आहे. मंगळवारी बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, शहरातील रस्त्यांचे अनेक महत्त्वाचे भाग पाण्याखाली गेले. रस्त्यावर नदी वाहत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या काही भागात अडकलेल्या नागरिकांना बचाव पथकाकडून रेस्क्यू करण्यात येत होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत अनेकजण अडकले. ट्रॅफिक जाममध्ये फसलेल्या नागरिकांना यावेळी अनोखी घटना पाहायला मिळाली. ट्विटरवर एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक नागरी स्वयंसेवक हातात कॅटफिश धरलेला दिसत आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच लोकंही हैराण झाले.
बंगळुरूच्या रस्त्यावर चक्क मासा पकडलासोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसत आहे, रस्त्यावर एका स्वयंसेवकाने हातात मासा पकडताच त्याच्या सहकाऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. ट्विटर युजर समीर मोहनने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'बंगळुरुला या. रस्त्याच्या मधोमध मासेमारी करताना तुम्हाला दिसून येईल. हा फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केले. रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मासे कसे आले, असा प्रश्न लोकांना पडला होता. मात्र, काहीजण या गोष्टीची खिल्ली उडवत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे ट्विट करत आहेत. या पोस्टला २४०० हून अधिक लाईक्स, अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
व्हायरल फोटो पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'बंगळुरू आता एका वेगळ्या उंचीवर जात आहे. रस्त्यावर मासे पकडता येऊ लागलेत. एका यूजरने गंमतीत लिहिले की, 'मी फिशिंग रॉड खरेदी करू शकतो आणि पुढच्या पावसासाठी मासेमारीची तयारी करू शकतो. तर 'तुम्हाला पिराना किंवा व्हेल मासा सापडतो का ते पहा अशी प्रतिक्रिया एका यूजरनं दिली आहे. दरम्यान एका यूजर्सनं खिल्ली उडवली, 'परंतु बंगळुरूमधील हवामान कमाल आहे तेथे अनेक खाद्य पर्याय आहेत असं म्हटलं आहे. बंगळुरूच्या ग्रामीण आणि शहरी भागात ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.