ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22 - सोशल मीडियात अग्रेसर असणा-या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने दहशतवादाला खतपाणी घालणा-यांची अकाऊन्ट बंद केली आहेत.
ट्विटरने 2016 मधील सहा महिन्यांच्या दुस-या टप्प्यात दहशतवाद वाढविण्यास मदत करणा-यांची जवळपास 3.7 लाख अकाऊन्ट बंद करुन टाकली आहेत. गेल्या 18 महिन्यात ट्विटरने सहा लाखहून अधिक अकाऊन्ट बंद केली आहेत. एका रिपोर्टनुसार, ट्विटरच्या माध्यमातून दहशतवादी संघटना एकत्रित आणण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच, नक्षलवाद, फुटीरवाद यांना प्रोत्साहन करण्याचेही काम काही युजर्सकडून करण्यात येत आहे. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी ट्विटरने अशाप्रकारे दहशतवादाचा प्रसार करणा-या युजर्सचे अकाऊन्ट बंद करणाचा निर्णय घेतला. ट्विटरने दहशतवादाचा प्रसार करणा-या 3,76,890 युजर्सची अकाउन्ट बंद केली आहेत. तर ऑगस्ट 2015 मध्ये 6,36,248 अकाऊन्ट बंद करण्यात आली होती.
दरम्यान, ब-याचवेळा ट्विटर अकाऊन्ट हॅक झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे त्यावर सुद्धा कंपनीकडून अंकुश ठेवण्यात येत आहे.