नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:34 AM2021-02-23T10:34:22+5:302021-02-23T10:35:58+5:30

Two diamond found Labour price 35 to 45 lakhs Panna Madhya Pradesh : ही घटना आहे पन्नाच्या किटहा गावातील. इथे एक मजूर खोदकाम करत होता. या खदानीत काम करत असलेल्या मजूराला एक नाही तर दोन चमकदार हिरे सापडले आहेत.

Two diamond found labour price 35 to 45 lakhs Panna Madhya Pradesh | नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...

नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...

googlenewsNext

(Image Credit : Aajtak)

Two diamond found Panna : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्हा हा हिऱ्यांची नगरी म्हणून ओळखला जातो. असं मानलं जातं की, येथील माती कुणालाही श्रीमंत करू शकते. लोक रातोरात लखपती होतात. सोमवारी अशीच एक घटना घडली. इथे एकाच दिवशी दोन हिरे सापडल्याने एका मजूराचं नशीब चमकलं आहे. 

ही घटना आहे पन्नाच्या किटहा गावातील. इथे एक मजूर खोदकाम करत होता. या खदानीत काम करत असलेल्या मजूराला एक नाही तर दोन चमकदार हिरे सापडले आहेत. मजूर भगवान कुशवाहाने आपल्या इतर चार साथीदारांसह हिरे कार्यालयातून जागा घेऊन शेतात खदान घेतली होती. सोमवारी माती गाळताना त्यांना दोन हिरे सापडले.

पहिला हिरा ९.९४ कॅरेटचा आणि दुसरा हिरा १.९३ कॅरेटचा आहे. हे दोन्ही हिरे त्यांनी हिरे कार्यालयात जमा केले आहेत. ७.९४ कॅरेटचा हिरा या वर्षात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा आहे. दोन्ही हिऱ्यांची अंदाजे किंमत ३५ ते ४५ लाख सांगितली जात आहे. मजुराने सांगितले की, हिऱ्याच्या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि ते त्यांच्यावरील कर्जरी फेडू शकतील.

पन्नाचे कलेक्टर संजय कुमार मिश्र म्हणाले की, पन्ना येथील जमीन कुणालाही श्रीमंत बनवू शकते. मजुरांना मिळालेले हिरे चांगल्या दर्जाचे आहेत. हे पुढील महिन्यातील लिलावात विकले जातील. हिरे मिळालेले मजूर आनंदी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे. 
 

Web Title: Two diamond found labour price 35 to 45 lakhs Panna Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.