wo Female Friend Fall In Love : पानीपतमध्ये दोन विद्यार्थिनींची अजब कहाणी समोर आली आहे. ही एक अशी कहाणी आहे ज्याची सुरूवात तर मैत्रीने झाली, पण नंतर दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. त्या इतक्या प्रेमात पडल्या की, समाज आणि आपल्या परिवाराची चिंता सोडून त्यांनी एकमेकींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलीसोबत दुसऱ्या मुलीचं लग्न ना घरातील लोकांना मान्य होतं ना समाजाला. त्यामुळे यातील एका मुलीने आपला जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा घरातील लोकांनी त्यांच्या प्रेमाला विरोध केला तेव्हा दोघीनींही घर सोडलं. तेव्हा दिल्लीतील एका एनजीओने त्यांना आधार दिला. दोघींनी एनजीओला त्यांना लग्न करायचं असल्याचं सांगितलं. ज्यानंतर एनजीओच्या सदस्यांनी पानीपतच्या महिला संरक्षण व बाल विवाह निषेध अधिकारी रजनी गुप्ता यांना संपर्क केला. रजनी गुप्ता यांनी सांगितलं की, दोन्ही मुली शहरातील वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात आणि त्यांचं एकमेकींवर प्रेम आहे. दोघी दूरच्या नातेवाईकही लागतात.
एका मुलीचं वय 20 आहे तर एकीचं वय 19 वर्ष आहे. त्यांनी सांगितलं की, सुरूवातीला समोर आलं होतं की, मुलीचे आई-वडील तिला मारहाण करत होते. पण हे खोटं निघालं. मैत्रीपासून सुरू झालेली त्यांची प्रेम कहाणी आता खूप पुढे गेली आहे. आता 19 वर्षीय मुलीने आपला जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर ती पतीच्या भूमिकेत असेल आणि 20 वर्षीय तरूणी पत्नी बनेल. सध्या दोन्ही तरूणी दिल्लीतील एनजीओमध्ये राहत आहेत.