Two Girls Married Each Other In Sonbadhra: उत्तर प्रदेश सोनभद्रमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे बभनी भागात अंधविश्वासातून दोन तरूणींनी एकमेकींशी लग्न केलं. त्यांना वाटलं की, असं केल्याने त्यांच्या पतींचा जीव सुरक्षित राहील. तरूणींनी मोठ्या धडाक्यात लग्न केलं. लग्नात मोठ्या संख्येने पाहुण्यांना बोलवण्यात आलं होतं. गावातील एका तांत्रिकाने सांगितलं की, लग्नानंतर दोन्ही तरूणींच्या पतीच्या मृत्यूचा योग होता. आणि समस्या दूर करण्यासाठी दोन तरूणींना आपसात लग्न केलं.
कुटुंबियांनी सांगितलं की, हे लग्न केवळ समस्या सोडण्यासाठी एका प्रतिकात्मक रूपात करण्यात आलं. जेणेकरून भविष्यात लग्नानंतर या दोन्ही तरूणींच्या पतींना दीर्घायुष्य लाभावे. तांत्रिकाने सांगितलं की, लग्नानंतर या तरूणींच्या पतींच्या मृत्यूचा योग होता आणि ही समस्या दूर करण्यासाठी दोन्ही तरूणींचं लग्न लावून देण्यात आलं होतं.
दोन्ही तरूणींचं लग्न प्रतिकात्मक रूपात नातेवाईकांच्या उपस्थितीत झालं. यावेळी डीजेसोबत नवरी बनून तरूणी वरात घेऊन आली. लग्नाचे सगळे रितीरिवाज पार पाडण्यात आले.
या अनोख्या लग्नाची सूचना मिळताच बैगा समजातील लोकांनी 2 दिवस पंचायत घेतली. हे अंधविश्वास वाढवणारं काम असल्याचं सांगत दोन्ही परिवारांवर दोन-दोन बकऱ्यांचं जेवण पूर्ण बैगा समाजाला देण्याचा दंड ठोठावला. पण दोन्ही परिवाराने असं करण्यात नकार दिला. दोन्ही परिवाराने सांगितलं की, हे त्यांनी त्यांच्या मुलींच्या सुखी जीवनासाठी केलं.
पोलिसांनी या प्रकरणावर सांगितलं की, त्यांना या प्रकरणाबाबत काहीच माहीत नाही. हे प्रकरण मीडियात समोर आल्यानंतर याची चौकशी केली जात आहे.