मुंबई : उन्हाळा आला की, कलिंगडासोबतच खरबूजं खाण्याचीही चंगळ भारतात बघायला मिळते. भारतात खरबूजापेक्षा कलिंगडाला जास्त मागणी असते. पण काही देशांमध्ये खरबूजाला जास्त मागणी असते. जपानमध्ये तर या फळाला फारच मोठी किंमत मिळते. नुकत्याच झालेल्या एका लिलावात दोन खरबूजांची तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या लाखोंची बोली लावण्यात आली.
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या एका लिलावात दोन खरबूजांची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण येथे या दोन खरबुजांसाठी तब्बल २९ हजार ३०० डॉलर म्हणजेच १९ लाखांहून अधिकची बोली लावण्यात आली आहे. या हंगामातलं हे पहिलंच युबारी खरबूज आहे.
खरबूज हे फळ खाणं किंवा खरेदी करणं म्हणजे जपानी संस्कृतीत स्टेटस सिम्बल मानलं जातं त्यामुळे हे खरबुज महाग तर असतंच पण अतिश्रीमंत लोकांचं फळ मानलं जातं. या हंगामातल्या पहिल्याचं खरबूजाची शनिवारी विक्री करण्यात आली. त्यासाठी २९ हजार ३०० डॉलर म्हणजे भारतीय मूल्याप्रमाणे १९ लाख ७१ हजार ७४३ रुपयांची बोली लावण्यात आली.