Interesting Facts : रात्रीच्या आकाशात आपल्याला चंद्राचे दर्शन होते. आतापर्यंत तुम्हाला आकाशात फक्त एकच चंद्र दिसला आहे. पण, आता लवकरच तुम्हाला दोन चंद्र पाहायला मिळणार आहेत. आपल्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला एक तात्पुरता छोटा साथीदार (Mini Moon) मिळाला आहे. हा एक छोटा चंद्र आपल्या पृथ्वीभोवती सुमारे दोन महिने फिरेल. म्हणजेच, आता आपल्याला एक नव्हे, तर दोन चंद्र दिसतील.
खगोल शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, ही एक दुर्मिळ घटना आहे. यामध्ये एक लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राखाली येईल आणि यावर्षी 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर, या कालावधीत पृथ्वीभोवती फिरत राहील. अॅस्टेरॉईड 2024 PT5, 7 ऑगस्ट रोजी NASA ला आढळला होता. हा आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. याला पाहण्यसाठी अत्याधुनिक दुर्बिण लागेल.
पृथ्वीभोवती दोन महिने फिरेलअमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या रिसर्च नोट्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हा लघुग्रह फार मोठा नाही. याचा व्यास फक्त 10 मीटर (33 फूट) आहे. पृथ्वीभोवती 53 दिवसांच्या कार्यकाळात, 2024 PT5 पूर्ण कक्षेत फिरू शकणार नाही. त्याऐवजी हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घोड्याच्या नाळीप्रमाणे प्रदक्षिणा घालेल. यामुळे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. हा लघुग्रह 9 सप्टेंबरपासून पृथ्वीच्या कक्षेत फिरत असून, पुढील 77 दिवस, म्हणजे 25 नोव्हेंबरपर्यंत फिरत राहील.
विशेष तंत्रज्ञानाने मिनी मून पाहता येणार 25 नोव्हेंबर नंतर 2024 PT5 लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होईल आणि सूर्याच्या कक्षेत परत येईल. विशेष म्हणजे, यापूर्वीही अनेक लघुग्रह पृथ्वीभोवती फिरले आहेत, परंतु 2024 PT5 इतका मंद गतीने फिरतोय की, तो डोळ्यांनी किंवा साध्या दुर्बिणीने पाहता येणार नाही.