कोरोना महामारीचं (Coronavirus) भयावह रूप सद्या भारतात बघायला मिळत आहे. दररोज लोक आपल्या आप्तांना मरताना बघत आहेत. स्थिती अशी झाली आहे की, जिवंत लोकांना उपचारासाठी हॉस्पिटल आणि मृतांना स्मशान मिळत नाहीये. त्यावर आणखी एक प्रश्न म्हणजे कोरोना महामारीच्या भीतीने लोक त्यांच्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कारही करत नाहीये.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अशीच स्थिती आहे. येथील दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी सारखे तरूण कोरोनाच्या भीतीला माणूसकीच्या भावनेने मात दिली आहे. भोपाळमध्ये राहणारे दोन्ही मुस्लिम तरूण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरणाऱ्या हिंदू लोकांच्या मृतदेहांवर अंत्य संस्कार करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, दानिश आणि सद्दामने आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या ६० हिंदू लोकांवर अंत्य संस्कार केले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्या घरचे लोक संक्रमणाच्या भीतीने अंत्य संस्कारला येत नाहीयेत किंवा कोरोनाच्या नियमामुळे स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यास पोहोचू शकत नाहीयेत.
दोघेही गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र हे काम करत आहे. इतकंच काय तर रोजा ठेवला असूनही ते सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या मारत आहेत. ते जाती-धर्म न बघता अंत्य संस्कार करत आहेत. दानिश आणि सद्दाम यांनी हे दाखवून दिलं आहे की, माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही.
ते म्हणतात ना -
‘मरने के बाद तेरा-मेरा मज़हब क्या मुसाफिर,तू बोल नहीं सकता मैं पूछ नहीं पाता’