चीन : चीनमध्ये एका लग्न सोहळ्यात नातेवाईक फार अचंबित झाले होते. त्यांना समजत नव्हतं की आपण नशेत आहोत की समोरच दृश्य खरं आहे. कारण समोर त्यांना चक्क सारखेच दिसणारे दोन जोडपे दिसायला लागले. पण कालांतराने कळलं की ही झिंग नसून खरोखरच सारखे दिसणारे दोन जोडपं विवाहबंधनात अडकताहेत. म्हणजेच सख्या जुळ्या बहिणींचं लग्न सख्ख्या जुळ्या भावांसोबत झालंं. आहे की नाही इंटरेस्टिंग?
मिरर यु.केने दिलेल्या वृत्तानुसार, झेंग दाशुआंग आणि झेंग शियाओशुआंग या जुळ्या भावांनी, लियांग जिंग आणि लियांग क्विंग या जुळ्या बहिणींसोबत 3 डिसेंबर रोजी लग्न केलं. या लग्नाचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा नेटिझन्सने तुफान या खिल्ली उडवली. त्यामुळे हा व्हिडिओ बराच व्हायरलही झाला. दोन्ही जुळ्यांमध्ये इतकं साध्यर्म आहे की नव्या इसमाला त्यांची ओळख पटणं जरा कठीण जाईल. लग्नातही दोन्ही जोडप्याने सारखाच वेश परिधान केल्याने त्या दोघांमध्ये आरसा उभा केलाय की काय असंच वाटत होतं. पाहा व्हिडीयो-
आणखी वाचा - सलग दोन लॉटरींमुळे महिला झाली लक्षाधीश, लंचब्रेकला असताना काढली लॉटरी
या दोन्ही जुळ्यांचे वडिल मोठे व्यवसायिक आहेत. दोन्ही घरांमध्येही व्यवसायिक नातं प्रस्थापित होतं. गेल्या दहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. म्हणूनच दोन्ही कुटूंबाने 'पहचान रिश्तेदारी मैं बदल देने' चा निर्णय घेतला. मग दोन्ही कुटूंबांनी जुळ्यांचं लग्न करण्याचा घाट घातला. जुळ्या लोकांचं लग्न हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर पसरली तेव्हा नेटिझन्सने दोन्ही जोडप्यांना डोळे उघडे ठेवून संसार करण्याचा सल्ला दिलाय.