Lady In Changing Room Live: चीनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा एका शॉपिंग मॉलमध्ये एक महिला चेंजिंग रूममध्ये होती. महिलेचा आरोप आहे की, त्यावेळी एका दोन वर्षाच्या मुलाने तिचा कपडे चेंज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाइव्ह केला. या घटनेनंतर मॉलमध्ये एकच गोंधळ झाला. कारण महिला त्या मुलावर आणि त्याच्याला शिव्या देऊ लागली होती.
ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हे सगळं तेव्हा झालं जेव्हा येथील एका यूनीक्लो स्टोरच्या चेंजिंग रूममध्ये महिला कपडे बदलत होती. तिथेच एक 2 वर्षाचा मुलगा उभा होता. हा मुलगा त्या महिलेचा नव्हता. त्याने त्याच्याकडील मोबाइलचा कॅमेरा महिलेकडे केला.
रिपोर्टनुसार, आधी तर महिलेच्या हे लक्षात आलं नाही. पण जेव्हा तिने वळून पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला. ती मुलावर ओरडू लागली. त्या मुलाची आई काही अंतरावरच होती. ती धावत तिथे आली. महिलेने मुलाच्या आईलाही शिव्या देणं सुरू केलं. महिलेचा आरोप आहे की, त्या मुलाने चेंजिंग रूमचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाइव्ह केला.
या घटनेनंतर महिलेने मुलाकडील मोबाइल हिसकावून घेतला. महिलेने असाही आरोप केला की, हा मुलगा आणि त्याची आई दोघेही तिच्यावर लक्ष ठेवून होते. सध्या हे प्रकरण शांत करण्यात आलं. यानिमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावरून महिलांचं लैंगिक शोषण आणि महिलांचे अधिकार याची चर्चा सुरू झाली आहे.