अनेकदा अशा घटना समोर येतात ज्यावर विश्वास ठेवणं शक्य होत नाही. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिएतनाममध्ये एका इमारतीच्या १२व्या मजल्याहून एक २ वर्षाची मुलगी पडली. मात्र, काळ आला असला तरी तिची वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. कारण इतक्या वरून पडून सुद्धा सुदैवाने तिचा जीव वाचला. एका डिलीवरी बॉयने तिला खाली पडण्यापासून वाचवलं.
सामान डिलीवरी करण्यासाठी आपल्या ट्रकमध्ये वाट बघत बसलेला ड्रायव्हर बाल्कनीत लटकलेल्या मुलीला पकडण्यासाठी गाडीतून बाहेर आला. जसा मुलीचा हात निसटला तेव्हा ड्रायव्हर न्गुयेनने तिला कॅच केलं. यानंतर मुलगी ड्रायव्हरची हातात पडली नाही. पण ती पडली तेव्हा तेव्हा तिथेच असल्याने तिचा जीव पटकन वाचवण्यात आला.
३१ वर्षीय ड्रायव्हर न्गुयेनने सांगितले की, तो एका ग्राहकाची पर्सनल डिलीवरी करण्यासाठी हनोईला आला होता. जेव्हा तो ग्राहक येण्याची वाट बघत होता तेव्हा त्याला मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने पाहिलं की, एका मुलगी इमारतीच्या १२व्या मजल्यावर लटकली आहे. हे बघून तो लगेच इमारती खाली गेला. त्याने मुलीचा जीव वाचवला.
ती खाली पडल्यावर तिच्या तोंडातून रक्त येत असल्याने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता ती बरी आहे. १६४ फूटाच्या उंचीवरून खाली पडलेल्या मुलीचा जीव वाचवल्याने न्गुयेन आनंदी आहे. तो म्हणाला की, सगळं काही फार वेगात झालं. पण मी मुलीवरून नजर हटवली नाही.
ड्रायव्हर न्गुयेन नागॉसला या कारनाम्याने हिरो बनवलं आहे. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच सोशल मीडियावरूनही त्याचं कौतुक होत आहे. लोक त्याला जीवनदाता म्हणत आहे.