बंगळुरु – लग्नाच्या आधी घरच्यांचा होकार आणि मुला-मुलीची सहमती गरजेची आहे. परंतु कर्नाटकात टॉसच्या माध्यमातून एक लग्न निश्चित झालं आहे. कर्नाटकातील अलूर तालुक गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी एका युवकाला दोन मुलींशी अफेअर असल्यामुळे लग्नाच्या पूर्वी अनेक कठीण समस्येचा सामना करावा लागला. लग्नाच्या वेळी या दोन्ही मुली पोहचल्या आणि दोघीही त्यांच्या मागणीवर ठाम होत्या.
अखेर गावातील काही मंडळींनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टॉसचा आधार घेतला. युवकाशी फक्त माझंच लग्न होणार असं दोन्ही मुलींचं म्हणणं होतं. त्यामुळे युवकासमोर मोठी अडचण निर्माण झाली. गाववाल्यांनी खूप समजवल्यानंतरही दोघीही ऐकण्यास तयार नव्हत्या. इतकचं नाहीतर एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. शेवटी गावकऱ्यांनी एकत्र जमत अनोखा निर्णय घेतला. नवरदेव दोन्ही मुलींपैकी कुणाशी लग्न करणार याचा निर्णय टॉसच्या आधारे घेतला जाईल. जी कुणी जिंकेल तिचं युवकासोबत लग्न लावलं जाईल असं ठरवण्यात आलं.
युवकाच्या कानशिलात लगावली
टॉसच्या पूर्वी ही अट ठेवण्यात आली की, पहिलं एका बॉन्ड पेपरवर तिघांची स्वाक्षरी घेण्यात आली. त्यात जो काही निर्णय होईल तो मान्य असेल असं लिहिण्यात आलं होते. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा टॉस उडवण्याची बारी आली तेव्हा सगळं होईपर्यंत मौन बाळगणाऱ्या युवकाने त्याची इच्छा जाहीर केली. ज्या मुलीने युवकासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तिला युवकाने मिठी मारली. युवकाचं हे कृत्य पाहून दुसऱ्या मुलीला सहन झालं नाही तिने युवकाला जोरदार कानशिलात लगावली. त्यानंतर युवकाचं कोणत्या मुलीसोबत लग्न होणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे टॉस करण्याची वेळ आलीच नाही.