पती-पत्नींच्या घटस्फोटांची एकशे एक कारणे आपण नेहमीच वाचत-ऐकत असतो. यात आता आणखी एका विचित्र कारणाची भर पडली आहे. PUBG या गेमची क्रेझ तुम्हाला माहीत असेलच. जगभरात हा गेम लोकप्रिय झाला असून लोक दिवसरात्री यात डोकं घालून बसलेले असतात. इतके की, PUBG मुळे घटस्फोटाची वेळ आली आहे.
यूएईमध्ये पतीने त्याच्या पत्नीला PUBG गेम खेळण्याची परवानगी दिली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. असे सांगितले जात आहे की, महिलेला तिच्या पतीने गेम खेळण्यापासून रोखले आणि सोबतच या पुढेही कधी गेम खेळायचा नाही, असे सांगितले. त्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले.
गल्फ न्यूजनुसार, अजमान यूएईच्या पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक केंद्राचे निर्देशक असलेले वफा खलील अल होसानी यांनी सांगितले की, हे एक विचित्र प्रकरण आहे. एका २० वर्षीय महिलेने पतीने गेम खेळण्याची परवानगी दिली नाही म्हणूण घटस्फोटासाठी अर्ज केला. महिलेने आरोप लावला की, मनोरंजनाचं माध्यम निवडण्याच्या अधिकारापासून तिला वंचित ठेवलं जात आहे. तसेच महिलेने दावा केला आहे की, ती हा गेम केवळ तिच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबतच खेळते.
दुसरीकडे पतीने कथित स्वरूपात असे म्हटले आहे की, त्याने पत्नीला कोणत्याही गोष्टीपासून वंचित ठेवले नाही. पण कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी त्याने तिला गेम न खेळण्यासाठी सांगितले होते. तसेच तो हेही म्हणाला होता की, त्याला जराही अंदाज नव्हता की, पत्नी केवळ गेम खेळण्यास मनाई केल्यावर घटस्फोटासाठी अर्ज करेल.