ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे अनेकांचा सध्या अधिक कल असतो. एकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर ते कधी घरी येतं असंच अनेकांना वाटतं असतं. मोबाईलमध्ये अनेकदा आपण त्याचं लोकेशन देखील पाहत असतो. मात्र तुम्हाला खूप भूक लागलेली असताना जर ऑर्डरचं घरी आली नाही अथवा ऐन वेळी ऑर्डर कॅन्सल केली तर प्रचंड संताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लंडनमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.
लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही. काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला धक्काच बसला. "सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं" असा मेसेज डिलिव्हरी बॉयने केला होता.
इतकच नाही तर अॅपमध्ये जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं दाखवत होतं. इलियाने या मेसेजचा एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि हा उबेर इट्सचा ड्रायव्हर ठीक आहे ना, असा सवाल केला. त्यानंतर मात्र उबरने तिच्याशी संपर्क साधला व तिला मोफत जेवण पाठवलं. मात्र या प्रकारानंतरही तिने ड्रायव्हरला दोष दिला नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. त्यामुळे माझं जेवण खाल्लं असेल, असं ती म्हणाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खरंच की काय? बर्गर खाणं पडलं चांगलंच महागात; मोजावे लागले तब्बल 20 हजार, 160 किमी अंतर केलं पार
लॉकडाऊनच्या काळात कडक नियम लागू असताना आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 160 किलोमीटर प्रवास केला आहे. बर्गरसाठी महिलेने हा प्रवास स्कूटीने केला आहे. मात्र बर्गर खाणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. कारण यासाठी तिला शे, बाराशे नाही तर तब्बल 20 हजार मोजावे लागले आहेत. कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. अशातच इंग्लंडमध्ये एका महिलेला लॉकडाउनच्या काळात बर्गर खाण्याची खूप इच्छा झाली. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने बहिणीसह स्कूटीने तब्बल 160 किलोमीटर अंतर पार केलं. मात्र यासाठी पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आहे. त्यांना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.