नवी दिल्ली - लग्न म्हटलं की सर्वांच्याच घरात आनंदाचं वातावरण असतं. प्रामुख्याने नवरदेव हा लग्नासाठी घोडा किंवा एखाद्या अलिशान गाडीमधून लग्नमंडपात येतो. पण तुम्हाला जर कोणी नवरदेव चक्क स्ट्रेचरवरून लग्नमंडपात घेऊन आल्याचं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. सध्या या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिंधी समाजामार्फत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात राहुल कटारिया आणि रितिका या जोडप्याचंही लग्न होणार होतं. लग्नाच्या पाच दिवस आधीच राहुल काही कामानिमित्त अहमदाबादला गेला होता. घरी परतत असताना त्याचा मोठा अपघात झाला. कुटुंबाला त्याच्या अपघाताची माहिती मिळाली. ते त्याला उदयपूरला घेऊन आले. पण पुन्हा ऑपरेशनसाठी त्याला अहमदाबादला न्यावं लागलं.
(फोटो - NBT)
राहुलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या त्याच्या पायात रॉड टाकण्यात आला आहे. तसेच पायाल प्लास्टर लावण्यात आलं. ज्यामुळे त्याला चालणं शक्य होत नव्हतं. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याने लग्न टाळण्याचा विचार केला. पण नंतर दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. रितिकानेही सामूहिक विवाहस्थळी रितीरिवाजाप्रमाणे विधीवत लग्न व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.
राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं
नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं. अपघातात तो गंभीर जखमी झाला. पण तरी विवाह मुहूर्त त्याने चुकू दिला नाही. एम्ब्युलन्समधून स्ट्रेचवर तो विवाहस्थळी पोहोचला. सिंधी समाजाच्या सेंट्रल युवा समितीच्या सदस्यांनी एम्ब्युलन्सह आवश्यक ती व्यस्था केली. रितिकासोबत त्याने 7 फेरे घेतले आणि लग्नबंधनात अडकला. सर्वांनाच यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.