शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

UFO एक्सपर्टचा मोठा दावा, या ग्रहावर आहे एलियन्सचा ठिकाणा; नासा लपवून ठेवत आहे मोठं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:28 PM

वैज्ञानिकांना जाणून घ्यायचं आहे की, खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? त्यासोबत वैज्ञानिक UFO बाबतही शोध घेत आहेत. आता एका UFO शोधकर्त्याने मोठा दावा केला आहे.

एलियन्सबाबत (Aliens) दररोज नवनवीन दावे केले जातात. जगभरातील वैज्ञानिक एलियन्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वैज्ञानिकांना जाणून घ्यायचं आहे की, खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? त्यासोबत वैज्ञानिक UFO बाबतही शोध घेत आहेत. आता एका UFO शोधकर्त्याने मोठा दावा केला आहे. याचा दावा आहे की, मंगळ ग्रहावर (Aliens on Mars) एलियन्सचा बेस आहे. त्यांनी लाल ग्रहावर २५ किमी रूंद एलियन्सचा बेस शोधला आहे. त्यांचं मत आहे की अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा एलियन्सच्या या बेसची माहिती जगापासून लपवत आहे.

या वैज्ञानिकाचं नाव स्कॉट वारिंग आहे. त्यांनी UFO आणि एलियन्सच्या जीवनावर वेगवेगळे रिसर्च लिहिले आहेत. स्कॉट वी वारिंग म्हणाले की, मंगळ ग्रहावर एक आयाताकृती आकाराची वस्तू बघण्यात आली आहे. या फोटोत ही वस्तू ग्रे कलरची दिसत आहे. 

स्कॉट वारिंग म्हणाले की, त्यांनी मंगळ ग्रहावर एलियन्सच्या २५ किलोमीटर रूंद बेस शोधला आहे. मंगळ ग्रहावर हे स्थान सुल्सी गोर्डीच्या डाव्या बाजूला आहे. वारिंग म्हणाले की, अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाला ही बाब जगापासून लपवायची आहे.

एलियन्सबाबत जगभरातील लोक वेगवेगळे दावे करतात. काही लोकांनी दावा केला आहे की, एलियन्स पृथ्वीवर UFO ने येतात. वेळोवेळी एलियन्स असण्याबाबत दावे केले जातात. पण अजूनपर्यंत एलियन्स असण्याचे पुरावे सापडले नाहीत.

याआधी एका यूएफओ रिसर्चरने अंटार्कटिकामध्ये एक सीक्रेट बेस आढळून आल्याचं सांगितलं होतं. त्यांनी हा शोध गूगल अर्थच्या माध्यमातून लावला होता. ते म्हणाले होते की, एलियन्सने हा बेस बनवला आहे. यावर रिसर्च करणाऱ्या काही वैज्ञानिकांनी दावा केला होता की, नासाला एलियन्सबाबत सगळं काही माहीत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेNASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयMarsमंगळ ग्रह