Alien : जगभरात एलियन्सबाबत सतत नवनवे दावे केले जातात. काही लोक एलियन्सच्या असण्यावर प्रश्न उपस्थित करतात तर काही लोक ते असण्यावर विश्वास ठेवतात. काही काळापासून अमेरिकेवर एलियन्सची माहिती लपवल्याचा आरोपही केला जात आहे. निक पोप जे आधी अमेरिकेच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी काम करत होते त्यांनी दावा केला आहे की, एलियन्स पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी समुद्री पक्षी सिगल्सला पाठवत आहेत. निकने या सिगल्स पक्ष्यांना एलियन्सचे गुप्तहेर म्हटलं आहे.
निक पोप म्हणाले की सिगल्सपासून सावध रहा. ते गुप्तहेर असू शकतात. सामान्यपणे सिगल्सना चोर म्हटलं जातं. हे सिगल्स लोकांच्या हातातून आइस्क्रीम चोरण्यासाठी आणि पदार्थ पळवण्यासाठी बदनाम आहेत. पण आता मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, हे सिगल्स याहूनही पुढे गेले आहेत. आता ते मनुष्यांमध्ये येऊन त्यांची माहिती चोरून एलियन्सपर्यंत पोहोचवू शकतात. असा दावा निक नावाच्या या यूएफओ एक्सपर्टने केला आहे.
निक म्हणाले की, एलियन्स या पक्ष्यांच्या माध्यमातून मनुष्यांवर लक्ष ठेवत आहेत. हे मनुष्यांमध्ये येतात आणि त्यांची माहिती एलियन्सपर्यंत पोहोचवतात. हे पक्षी गुप्तहेर होण्यामागे निक यांनी अनेक कारणे सांगितलं आहेत. निकनुसार एलियन्स अशा वस्तूच्या माध्यमातून गुप्तहेरी करण्याच्या प्रयत्नात आहेत ज्यावर मनुष्यांना संशय होणार नाही. अशात सिगल्स सर्वात सोपं माध्यम ठरू शकतं. सिगल्ससोबतच एलियन्सची नजर माश्यांवरही आहे.
निक यांचा दावा आहे की हे सिगल्स अशा डिवाइससोबत येऊ शकतात ज्यात रेकॉर्डिंग होईल. ते मनुष्यांवर लक्ष ठेवतील आणि सगळं काही रेकॉर्ड करतील. त्यानंतर सगळी माहिती एलियन्सपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे पुढे जवळपास जर सिगल्स आणि माश्या दिसल्या तर सावध व्हा.
निक यांनी सांगितलं की, आता एलियन्सना मनुष्यांबाबत डिटेल माहिती हवी आहे. त्यासाठी सिगल्सच्या माध्यमातून सगळं रेकॉर्डिंग केलं जाईल. त्यांच्या शरीरावर छोटे हायटेक कॅमेरा लावून त्यातून रेकॉर्डिंग केलं जाईल. ते ड्रोन सारखं काम करतील. ड्रोनवर मनुष्याची नजर पडली तर ते समजून जातील की, त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे. पण पक्षी आणि माश्यांवर कुणाला संशय येणार नाही.