जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांची सकाळ चहा किंवा कॉफीचा घोट घेतल्याशिवाय होत नाही. कारण काही लोकांसाठी चहा किंवा कॉफी टॉनिकसारखी असते. यामुळे त्यांना दिवसभर एनर्जी मिळते. पण तुम्हाला वाटत असेल की, चहाची सवय केवळ मनुष्यांनाच असते तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण यूकेमधील एक घोडा चहा घेतल्याशिवाय कामच करत नाही.
आपल्या दिवसाची सुरूवात चहाने करणारा हा घोडा २० वर्षांचा असून त्याचं नाव Jake आहे. हा घोडा इंग्लंडच्या Merseyside पोलीस विभागात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे.
(Image Credit : crimeonline.com)
Jake त्याच्या तबेल्यात रोज सकाळी चहाची वाट बघत असतो. पोलीस विभागानुसार, चहा घेतल्याशिवाय तो कामच करत नाही. त्यामुळे त्याला रोज सकाळी एका मोठ्या कपात आम्ही चहा देतो.
(Image Credit : metro.co.uk)
Jake मोठ्या चवीने चहा पितो. महत्त्वाची बाब म्हणजे Jake ला सामान्य चहा दिला जात नाही. त्याच्यासाठी खास प्रकारचा चहा तयार केला जातो. हा चहा Skimmed Milk, दोन मोठे चमचे साखर आणि थंड पाण्याचा केला जातो. त्याला गरम चहा घेणं पसंत नाही.
Lindsey Gaven ही Jake ची ट्रेनर आहे. ती सांगते की, हा घोडा इतर घोड्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या चहा पिण्याच्या सवयीबाबत सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे सगळेच त्याची विशेष काळजी घेतात. जर सकाळी सकाळी कुणी चहा सोबत न घेताच त्याच्याकडे गेलं तर त्याला राग येतो. Jake या परिसरात होणाऱ्या फुटबॉल मॅचवर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांची मदत करतो. आता २० वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याचं रिटायरमेंटही जवळ आहे.