जगभरात लोक वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड आपल्या नावावर करत असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guiness Book of World Records) मध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक अनेक कारनामे करतात. हे लोक हे वेगवेगळे कारणाने कारनामे करून जगभरात लोकप्रिय होतात. एका महिलेने एकाच दिवशी दोन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. रोलर स्केट्सवर कार्ट व्हील करून या महिलेने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. लोक तिची ही कलाकारी पाहून थक्क झाले आहेत.
यूनायटेड किंगडम(UK) ची Tinuke Orbit नावाच्या महिलेने एक मिनिटात रोलर स्केट्सवर ३० कार्ट व्हील करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. Tinuke एक प्रोफेशनल रोलर स्केटर आहे. तिने गेल्यावर्षीच दोन वर्ल्ड रेकॉर्ड तोडले आहेत. त्यासोबतच तिने ई-स्केट्सवर ७० स्पिन करूनही एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिचा हा कारनामा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tinuke म्हणाली की, 'हे दोन्ही रेकॉर्ड मिळवल्याने माझी लॉकडाऊनमधील स्वप्ने खरी ठरली आहेत. लॉकडाऊनमुळे हैराण असाल तर ही स्वत:ला आव्हान देण्याची एक संधी आहे. याने तुम्हाला मदत होईल. मी असं करायला अनेकांना प्रोत्साहित करते. मी कधीही विचार नव्हता केला की, मी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकेन. मी खूप खूश आहे. प्रॅक्टिस करण्याचा मला फायदा झाला.