यूक्रेनच्या(Ukraine) एका कपलने एका अनोख्या प्रयोगासाठी एकमेकांचे हात साखळीने बांधून घेतले आहेत. कपलने प्रयोग व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी केला. या प्रयोगाच्या माध्यमातून अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया यांनी आपलं नातं कंफर्ट झोनच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यांना हे बघायचं होतं की, ते कठीण परिस्थितीतही आपलं रिलेशनशिप टिकवण्यात यशस्वी ठरतात का.
अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया पुढील तीन महिन्यांसाठी असेच एकाच साखळीत बांधलेले राहतील. यादरम्यान त्यांना त्यांची दैनंदिन कामेही एकमेकांच्या मदतीने करावी लागेल. यूक्रेनच्या नॅशनल रजिस्टर ऑफ रेकॉर्ड्समध्ये काम करणारे आणि हा प्रयोग सुपरवाइज करणारे विटाली जोरीन म्हणाले की या दोघांनी पूर्ण विचार करून हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे पण वाचा : लय भारी! सोशल डिस्टेंसिंगचे धडे देणारं प्री वेडिंग फोटोशुट; पाहा जोडप्याचे भन्नाट फोटो)
या कपलने व्हॅलेंटाईन डे ला यूक्रेनच्या कीव शहरातून या प्रयोगाला सुरूवात केली होती. या कपलची सर्वात पहिली टेस्ट समोर तेव्हा आली जेव्हा ते आपल्या घरापासून ३२५ मैल दूर एका टॅक्सीने जात होते. त्यावेळी त्यांना ठरवायचं होतं की, लेडीज टॉयलेटमध्ये जायचं की, जे जेन्ट्स. यावेळी दोघांनी निर्णय घेतला की, ते लेडीज टॉयलेटमध्ये जातील. हे बघून क्लीनर हैराण झाला होता.
काही व्हिडीओजमध्ये अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया खास प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसले होते. या कपड्यांमध्ये वरपासून खालपर्यंत झीप लागली होती. जेणेकरून दोघांना कपडे बदलण्यात अडचण येऊ नये. या कपलचं मत आहे की, ते हे चॅलेंज नक्की पूर्ण करतील. त्यांना याचीही कल्पना आहे की, पर्सनल स्पेस मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (हे पण वाचा : व्हॅलेंटाईन डे ला डेटसाठी एक्स गर्लफ्रेन्डने दिला नकार, प्रियकराने केलं अपहरण आणि मग.....)
जोरीने सांगितले की, जर त्यांनी या तीन महिन्यात वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर त्यांना इमरजन्सी सर्व्हिसच्या तज्ज्ञांची गरज पडेल. जेणेकरून ते त्यांची साखळी सोडवतील. आता बघुया दोघे तीन महिने असंच एकत्र राहू शकतात का.