४१ वर्षीय एक व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून बेरोजगार आहे आणि आता त्याने त्याच्या आई-वडिलांवरच केस दाखल केली आहे. ऑक्सफोर्डसारख्या मोठ्या यूनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेऊनही ही व्यक्ती गेल्या १० वर्षांपासून बेरोजगार आहे. फैज सिद्दीकी नावाच्या या व्यक्तीचं नाव आहे की, तो त्याच्या आई-वडिलांवर अवलंबून आहे.
फैज ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिकला आहे आणि वकिलीचं प्रशिक्षणही त्याने घेतलंय. तरी त्याने त्याच्या आई-वडिलांवर केस दाखल केली आहे. आणि मागणी केली आहे की, त्याच्या आई-वडिलांनी त्याला आयुष्यभर आर्थिक समर्थन द्यावं. फैजचे आई-वडील दुबईमध्ये राहतात. त्यांचा लंडनमध्ये एक फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये फैज गेल्या २० वर्षापासून राहत आहे. लंडनच्या हायडी पार्कमधील या फ्लॅटची किंमत १ मिलियन पाउंडपेक्षा अधिक आहे.
फैजची आई रक्षंदा ६९ वर्षांची आहे. तर त्याचे वडील ७१ वर्षांचे आहेत. ते फैजला सध्या दर आठवड्याला ४०० पाउंड म्हणजे ४० हजार रूपये देतात. म्हणजे महिन्याला जवळपास ते फैजला दीड लाख रूपये देतात. सोबतच फैजची बिलंही भरतात. मात्र, फैजसोबत झालेल्या वादानंतर आता त्याच्या आई-वडिलांना त्याला सपोर्ट करायचा नाहीये.
फैजचं म्हणणं होतं की, तो त्यांच्या आर्थिक मदतीचा हकदार आहे. कारण बालपणापासून आरोग्य ठीक नसल्याने त्याच्या करिअरचं आणि लाइफचं नुकसान झालं आहे. आणि जर त्याचे आई-वडील त्याला सपोर्ट करणार नसेल तर हे त्याच्या मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. रक्षंदा आणि जावेद यांचे वकिल जस्टिन वारशॉ म्हणाले की, फैजचे आई-वडील गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुलाच्या मागण्या पूर्ण करत आहेत. पण त्यांना आता तसं करायचं नाहीये.
याआधी २०१८ मध्ये फैजने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीवर केस ठोकली होती आणि १ मिलियन पाउंडची डिमांड केली होती. त्याचा दावा होता की, ऑक्सफोर्डमधील शिक्षणाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे तो एका टॉप अमेरिकी लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकला नव्हता. पण फैजची ही केस कोर्टाने रिजेक्ट केली होती.