Bhabhi Devar News : उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांच्या हस्तक्षेपाने दीर आणि वहिनीच्या संबंधाला लग्नाचं रूप देण्यात आलं. एका अपघातात पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा झालेल्या पत्नीचं दीरासोबत अफेअर सुरू होतं. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांचं लग्न लावून दिलं. बऱ्याच महिन्यांपासून लग्नास नकार देत असलेल्या दीराने वहिनीच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिची पत्नी म्हणून स्वीकार केला. पोलीस स्टेशन परिसरातील मंदिरात कुटुंबियांसमोर त्यांचं लग्न लावण्यात आलं.
दीराने लग्नास दिला होता नकार, म्हणून...
मिळालेल्या माहितीनुसार, साधु विश्वकर्माची मुलगी मौसमी विश्वकर्माचं लग्न अंधऊ गावातील त्रिलोकी विश्वकर्मासोबत 2015 मध्ये झालं होतं. दोघांना लग्नानंतर एक मुलगाही झाला. पण नियतीचा खेळ वेगळाच होता. एका वर्षांआधी वीज पडल्याने त्रिलोकीचा मृत्यू झाला. यानंतर विधना मौसमीची जवळीक दीरासोबत वाढली. पोलिसांनी सांगितलं की, पतीच्या मृत्यूनंतर महिलाचं दीरासोबत नातं सुरू झालं. पण तो लग्नास नकार देत होता.
जेव्हा मौसमीने दीर जगरनाथला लग्नाबाबत विचारलं, पण त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर मौसमी आणि तिच्या परिवाराने पोलिसांकडे याबाबत मदत मागितली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्यातील समस्या मिटवली. त्यानंतर पोलीस स्टेशनमधील मंदिरातच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. सध्या या लग्नाची चर्चा सुरू आहे.