शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

बाबो! लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 11:12 AM

एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे. यानंतर पुढे जे काही घडलं ते समजल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

नवी दिल्ली - लग्नाच्या आधी जर एखादी मुलगी गर्भवती असेल तर लोक तिच्याबाबत काहीही बोलतात. चर्चा करतात. अशातच अनेकदा लग्न देखील मोडलं जातं. पण काही वेळा भलतंच घडतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे. यानंतर पुढे जे काही घडलं ते समजल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नाच्या 24 तास आधी नवरीबाई आई झाली आहे. मात्र यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील बडेराजपूर येथे आदिवासी समाजातील लोक राहतात. येथे राहणाऱ्या शिवबत्ती हिचा विवाह 31 जानेवारी रोजी ओडिशाच्या चंदन नेतामसोबत ठरला होता. लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 जानेवारीला शिवबत्तीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. मात्र, याचदरम्यान अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहीच वेळात समजलं की तिने एका बाळाला जन्म दिला आहे.

बाळ होताच वर आणि वधू पक्षातील मंडळी झाली आनंदी 

विशेष म्हणजे बाळ होताच वर आणि वधू पक्षातील मंडळी खूप आनंदी झाली. लग्नासोबत आता बाळ झाल्याने त्याचा आनंद डबल झाला. घरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. याबाबत नवरीची आई सरिता मंडावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजात पैठू प्रथा नावाची एक प्रथा आहे. पैठू प्रथा म्हणजेच एकप्रकारचं लिव्ह इन रिलेशनशिपही म्हणू शकता. या प्रथेमध्ये मुलगी आपल्या कुटुंबीयांना माहिती देऊन आणि त्यांच्या परवानगीने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्नाच्या आधीच राहायला सुरुवात करते. 

लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीने दिला बाळाला जन्म 

काही वेळ सोबत घालवल्यानंतर म्हणजेच पैठू झाल्यानंतर दोघांचे कुटुंबीय त्यांचं लग्न लावून देतात. या प्रथेतूनच शिवबत्ती 2021 मध्ये आपल्या आवडीचा मुलगा चंदन याच्या घरी पैठू गेली होती. ते दोघे जवळपास आठ महिने एकत्र राहिले होते. याचा दरम्यान ती गर्भवती राहिली. यानंतर दोन्हीकडच्या मंडळींनी त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आणि लग्नपत्रिका छापली. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीने लग्नाच्या आधीच बाळाला जन्म दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नJara hatkeजरा हटके