इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 02:54 PM2019-04-19T14:54:06+5:302019-04-19T14:59:40+5:30

जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात.

Unique tradition father gives poisonous snakes to his son in law in dowry | इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न

इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न

googlenewsNext

(Image Credit : AmarUjala)

जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. आता लग्नात गिफ्ट म्हणूण किंवा हुंडा म्हणूण पैसे किंवा गाडी दिल्याचं तुम्ही पाहिलं असेलच. पण कधी तुम्ही हुंड्यात विषारी साप दिलं जात असल्याचं कधी कुठे ऐकलंय का? नसेल ऐकलं. पण हे खरंय.

मध्य प्रदेशच्या गौरिया समाजात ही प्रथा आहे. इथे लोक सासऱ्याकडून जावयाला हुंड्यात २१ विषारी साप दिले जातात. या समाजात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. यामागे अशी मान्यता आहे की, या समाजातील एखादी व्यक्ती जेव्हा मुलीला जर लग्नात साप देत नसेल तर त्या मुलीचं लग्न लवकरच तुटतं. 

असंही बोललं जातं की, मुलीचं लग्न जुळताच सासरा जावयाला गिफ्ट देण्यासाठी साप पकडणे सुरु करतात. या अनेक विषारी सापांचाही समावेश असतो. येथील लहान मुलांना देखील विषारी सापांची अजिबातच भीती वाटत नाही. उलट ते या सापांसोबत सहजपणे खेळताना दिसतात. 

या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा साप पकडने आणि त्यांचे खेळ करणे हा आहे. हेच कारण आहे की, सासरा जावयाला हुंड्यात साप देतात. जेणेकरुन तो या सापांच्या माध्यमातून कमाई करु शकेल आणि परिवाराचं पोट भरु शकेल. 

या समाजात सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही कठोर नियमही केले आहेत. असे म्हटले जाते की, जर साप त्यांच्या टोपलीत मरण पावला तर संपूर्ण कुटुंबातील लोक टक्कल करतात. सोबतच समाजातील लोकांना जेवणही द्यावं लागतं. 

Web Title: Unique tradition father gives poisonous snakes to his son in law in dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.