अनेकदा जुन्या, वापरात नसलेल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. घरातील वापरात नसलेल्या वस्तू फेकून दिल्या जातात. पण सार्वजनिक ठिकाणी एखादी इमारत किंवा वास्तू वापरात नसेल तर ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहते. अशी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. तामिळनाडूतील उटीमध्ये असाच एक प्रकार दिसून आला आहे. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय म्हणून बांधण्यात आलेली इमारत कोणीही वापरत नव्हतं. याचाच फायदा घेत काही कलाकारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आर्ट गॅलरी सुरु करण्याचा विचार केला आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं.
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन माहिती देत यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, 'एका वापरात नसणाऱ्या शौचालयाच्या इमारतीला आर्ट एक्झिबिशन सेंटर म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. या आर्ट गॅलरीचे नाव द गॅलरी वन टू असं देण्यात आलं आहे. महानगरपालिकेने जवळच नवीन सार्वजनिक शौचालय बांधलं असल्यानं इमारतीमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी परवानगी दिली.' सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान
आर. मणिवन्नम या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या आर्ट गॅलरीमध्ये एक लहान वाचनालय सुरु करण्यात आलं आहे. हे वाचनालय स्थानिक रहिवासीयांसाठी मोफत सेवा देणार आहे. येथे बसून स्थानिकांना निवांतपणे पुस्तके वाचता येणार आहेत. या आर्ट गॅलरीत मणिवन्नम यांचीही काही चित्र लावण्यात आली आहेत. लोक सध्या या आर्ट गॅलरीला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. शौचायलाच्या जागेत उभी राहिलेली ही खास आर्ट गॅलेरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जुगाड म्हणून चक्क गाईच्या पोटाला स्क्रिन बनवून सिनेमा बघत बसले; IPS अधिकारी म्हणाले....