जगात इमानदारीच्या पडद्याआडून कितीतरी अवैध धंदे केले जातात. अनेक मसाज पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जातं तर कधी सामान्य वस्तूंच्या स्टोरमध्ये दारू विकली जाते. नुकतंच इटलीच्या एका शहरातून एक मोठं रॅकेट पकडण्यात आलं.तसे तर सामान्यपणे लोक सलूनमध्ये केस कापण्यासाठी, केस कलर करण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी जातात. पण एका मोठ्या मिशनवर असलेल्या पोलिसांच्या एका टिमने जेव्हा एका खास सलून शॉपवर नजर ठेवली तेव्हा त्यांना एक बाब समजली नाही.
55 वर्षीय व्यक्तीच्या या सलूनमध्ये असे लोकही मोठ्या संख्येने जात होते, ज्यांच्या डोक्यावरही केस नव्हते आणि त्यांना दाढीही नव्हती. मग प्रश्न हा होता की, केस कापायचे नाहीत आणि दाढीही करायची नाही, मग हे लोक सलूनमध्ये का जात होते? पोलिसांना संशय आला. पोलिसांच्या एका टिमने दुकानाची चौकशी सुरू केली.
चौकशीनंतर समोर आलं की, हे लोक या दुकानात केस कापण्यासाठी नाहीतर ड्रग्स घेण्यासाठी जात होते आणि सलूनचा मालक एक मोठा ड्रग डीलर आहे. आधी पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. तिथे त्यांना ड्रग्स सापडले आणि नंतर दुकानावर धाड टाकली तर तिथेही ड्रग्स सापडले.
सध्या सलूनच्या नावावर ड्रग्सचा धंदा करणाऱ्या व्यक्तीला मरासी तुरूंदात ठेवण्यात आलं. इथे तो शिक्षेची वाट बघत आहे. सगळ्यात आधी इटली पोलिसांनी जेनोओच्या फॉसे भागात ड्रग्सच्या रॅकेटची माहिती मिळाली होती. पण त्यांच्याकडे काही पुरावा नव्हता. त्यानंतर पोलिसांनी टिम तयार केली आणि यातीलच एका टिमने मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला.