माजी अमेरिकन पॉर्न स्टारकडे एका प्रशंसकाने अशी डिमांड केली जी ऐकून तिला धक्का बसला. पॉर्न स्टारला समजलंच नाही की, काय उत्तर द्यावं. ९० च्या काळात अॅडल्ट इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा राहिलेली लीसा एना (Lisa Anna) ने सोशल मीडियावर त्या अजब डिमांडबाबत सांगितलं. ती म्हणाली की, जेव्हा मी माझ्या फॅनच्या डिमांडबाबत ऐकलं तेव्हा मला काही समजलं नाही की, काय उत्तर देऊ.
परफॉर्मन्स दरम्यान घेतला होता चावा
अॅडल्ट इंडस्ट्री (Adult Industry) मध्ये आपली ओळख निर्माण केल्यावर लीसा स्पोर्ट्स आणि ब्रॉडकास्टिंगच्या क्षेत्रात गेली. ती तिचं पॉडकास्ट होस्ट करते. ज्यात ती दुसऱ्या पॉर्न स्टार्सच्या मुलाखती घेते. तिच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये तिने तिच्या फॅन्स अजब व्यवहाराबाबत सांगितलं. ती म्हणाली की, एकदा स्टेजवर परफॉर्मन्स करताना एकाने तिला चावा घेतला होता.
आउट ऑफ कंट्रोल होतात लोक
लीसा म्हणाली की 'एक पॉर्न स्टारर म्हणून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोक आम्हाला बघून आउट ऑफ कंट्रोल होतात. मलाही अशा घटनांचा सामना करावा लागला. पण एका फॅनची भयानक डिमांड मला अजूनही आठवते. त्याने अशी काही डिमांड केली की, ऐकताच माझं डोकं काम करणं बंद झालं होतं. लीसाच्या एका फॅनने तिच्याकडे डिमांड केली की, तिने तिचे दात पाडून ते विकावे, त्याला ते खरेदी करायचे आहेत.
भयंकर मेसेज येतात
ही अजब डिमांड ऐकून लीसा हैराण झाली होती. ती म्हणाली की, 'मला समजलंच नाही की, काय उत्तर देऊ. कुणी असा विचारच कसा करू शकतं? लीसाने सांगितलं की, तिला वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर मेसेजही येतात. ज्यात लोक एकटं भेटण्याची विनंती करतात. तर कुणी सतत तिच्यावर नजर ठेवत असल्याचं सांगत होता. हे सगळं कधी कधी फारच भीतीदायक वाटतं.