एखाद्या स्नॅक्सची किंमत किती असू शकते? 1-2 हजार किंवा खूप झालं तर 4-5 हजारापर्यंत. मात्र एका बर्गरसारख्या सामान्य स्नॅक्सची किंमत लाखोंच्या घरात पोहोचली तर याबाबत ऐकून कोणीही चक्रावून जाईल. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील बेसबॉल स्टेडियममध्ये घडला, जिथे एका बर्गरची किंमत तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे.
अटलांटा येथील ट्रूइस्ट पार्क येथे हा प्रकार घडला. येथे जॉर्जियाहून येणाऱ्या पर्यटकांना एक खास बर्गर दिला जात आहे, ज्याची किंमत सामान्य बर्गरपेक्षा लाखो पटीने जास्त आहे. यानंतर हा सामना दुरुच, मात्र ही घटना लोकप्रिय झाली ती फक्त आणि फक्त या अत्यंत महागड्या बर्गरमुळे. या बर्गरची किंमत ऐकून तुम्हीही नक्कीच चक्रावून जाल.
जगातील स्वस्त आणि टिकाऊ फास्ट फूड म्हणून ओळखल्या जाणार्या या बर्गरची बेसबॉल स्टेडियममध्ये 33,000 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 25 लाख रुपये किंमत होती. हा विनोद नाही, तर सत्य आहे की एका बर्गरची किंमत 25 लाख रुपये ठेवण्यात आली. जर ही किंमत तुम्हाला जास्त वाटत असेल तर इथे एक 'स्वस्त बर्गर' देखील उपलब्ध होतं. त्याची किंमत आहे 151 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 'फक्त' 11,465 रुपये.
रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळी, रशियातील मॅकडोनाल्डचे आउटलेट बंद असताना लोक 1-2 लाख रुपयांना ब्लॅकमध्ये बर्गर खरेदी करताना दिसले होते. सध्या हा महागडा बर्गर वर्ल्ड सीरीज 2021 साजरा करण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. त्याचं स्वस्त वर्जन 151 डॉलरला ठेवण्यात आलं आहे. कारण सीरिजचे 151 वर्षे पूर्ण झाले आहेत. 25 लाखांचा बर्गर बनवण्यासाठी काही महागड्या गोष्टींचा वापर करण्यात आला आहे, पण त्या इतक्याही महाग नाहीत की बर्गर हिऱ्यांच्या किमतीत विकला जावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.