एका तरूणीने आपल्या बॉयफ्रेन्डच्या कारनाम्यांचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. बॉयफ्रेन्डने तिला कशाप्रकारे २ वर्ष फसवलं आणि सतत खोटं बोलत राहिला, याबाबतचा एक व्हिडीओ तिने शूट करून टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.
ही घटना आहे अमेरिकेतील टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून कॅथरीन नावाच्या मुलीने आपल्या बॉयफ्रेन्डचं सत्य मांडलं. कॅथरीने म्हणाली की, २०१८ मध्ये मी त्याला भेटले होते. काही भेटींमधेच मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याच्यासोबत आयुष्य जगण्याची स्वप्ने बघू लागले होते.
पण एप्रिल २०२० मध्ये कॅथरीनचा बॉयफ्रेन्ड अचानक 'बेपत्ता' झाला होता. त्याचा फोनही लागत नव्हता. ज्यामुळे कॅथरीनने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण त्याचा कुठेच काहीच पत्ता लागला नाही. उलट पोलीस म्हणाले की कॅथरीनकडून सांगण्यात आलेल्या नावाची कुणी व्यक्ती नाही. म्हणजे कॅथरीनच्या बॉयफ्रेन्डचं नाव-पत्ता सगळं खोटं होतं.
'द सन यूके'नुसार, या घटनेमुळे कॅथरीनला मोठा धक्का बसला. कारण ज्या बॉयफ्रेन्डसोबत ती दोन वर्षापासून होती. तोच तिला दगा देत होता. अशात कॅथरीनने त्याच्याबाबत सर्वांना सांगण्याचा निर्णय घेतला.
कॅथरीनने सांगितलं की, मैत्रीच्या काही काळानंतर मला जाणीव होऊ लागली होती की, ती व्यक्तीला दगा देत आहे. पण तेव्हा मी त्याच्या प्रेमात आंधळी झाले होते. कॅथरीन म्हणाली की, तो नेहमी मला हॉटेलमध्ये भेटत होता. सोशल मीडिया यूज करण्याचा दावा करत होता. त्याने कधीच त्याच्या परिवारासोबत भेट करून दिली नाही. पण तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवत राहिले.
कॅथरीन म्हणाली की, एक दिवस मला ता भेटला आणि म्हणाला की त्याची आई खूप आजारी आहे. तो तिच्या देखरेखीत बिझी आहे. जेव्हा मी आईला भेटण्याबाबत बोलले तर त्याने नकार दिला. एकदा तो भेटला तेव्हा त्याने त्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. जे खरं होतं. त्याने माझी २ वर्ष फसवणूक केली आहे.