वर्षानुवर्षे जे चालत आलं ते न करता सीमा तोडून काही नवं करण्याची इच्छा सर्वांमध्ये असते. जर ही इच्छाशक्ती ठेवून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर काही अजब रेकॉर्डही कायम होतात. अशीच इच्छाशक्ती शेतात दाखवली तर टॉड आणि डोना स्कीनरसारखा रेकॉर्डही बनवू शकता.
अमेरिकेच्या ओहायोमध्ये राहणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी शेतात ९८१ किलोग्रॅम वजनाच्या भोपळ्याचं उत्पादन घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. शेतकऱ्यांची ही जोडी आपल्य शेतात गेल्या ३० वर्षापासून आपल्या शेतात अशाचप्रकारे भोपळ्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांची मेहनत आता रंगात आली आणि त्यांनी २१६४ पाउंडच्या भोपळ्याचं उत्पादन घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.
डबलिनमध्ये सुरू असलेल्या भाजी स्पर्धेत त्यांनी जेव्हा आपला भोपळा प्रदर्शित केला तर त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनला. पण पहिल्या नजरेत पाहून याच्या वजनाचा अंदाज कुणाला आला नव्हता. पण जेव्हा याला तराजूवर ठेवण्यात आलं, तेव्हा याचं वजन २१६४ पाउंड म्हणजे ९८१ किलोग्रॅम भरलं.
भोपळ्याचं वजन पाहून तिथे उपस्थित लोक हैराण झाले. कारण १०० क्विंटलचा भोपळा याआधी कुणीही पाहिलेला नव्हता. दोघांनी WTOV टीव्ही सोबत बोलताना सांगितलं की, ‘याचा आम्हाला अजिबात अंदाज नव्हता की, याचं वजन इतकं भरेल. पण जेव्हा आम्हाला समजलं की, ज्या भोपळ्याचं आपण उत्पादन घेतलं त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय तेव्हा आम्हला खूप आनद झाला'.