तुम्ही कधी ऐकलंय का की, दारू न पिताच कुणी नशेत राहत असेल. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेच्या पोटात अल्कोहोल तयार होतं. आश्चर्याची बाब म्हणजे तिने कधी दारूला हातही लावला नाही. पोटात मद्य तयार झाल्यावर ते शरीरातील रक्ता मिश्रित होतं आणि त्यामुळे ती नशेत राहते. पोटात तयार होत असलेल्या मद्यामुळे सारा लेफवर नावाच्या या महिलेचं लिव्हर खराब झालं आहे आणि तिला लिवर ट्रान्सप्लांटची गरज आहे.
६ पटीने अधिक नशेत राहते ही महिला
महिलेच्या पोटात जास्त प्रमाणात एथेनॉलची निर्मिती होते. जे तिच्या रक्तात मिश्रित होतं आणि यामुळे ती नेहमीच नशेत राहते. सारा लेफवर ब्रेथ-एनेलायझरमध्ये सामान्यापेक्षा ६ पटीने अधिक अल्कोहोलिक आढळली होती.
metro.co.uk च्या रिपोर्टनुसार, ३८ वर्षीय सारा लेफवर ऑटो-ब्रुएरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पीडित आहे. या आजारामुळे महिलेच्या पोटात नेहमी अल्कोहोल तयार होत राहतं. (हे पण वाचा : १०० किलोच्या महिलेने काही महिन्यातच कमी केलं तब्बल ४५ किलो वजन, वाचा तिने काय केलं....)
सारा लेफवर यांची तब्येत गेल्या काही वर्षांपासून खराब राहत होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा ती डॉक्टरकडे गेली आणि गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑटो-ब्रुएरी सिंड्रोम नावाचा आजार असल्याचं समोर आलं.
सारा म्हणाल्या की, हा आजार फार त्रासदायक आहे. कारण यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आजाराचे स्पेशालिस्ट डॉक्टरही नाहीत. त्या म्हणाल्या की, सुरूवातीला जेव्हा त्या डॉक्टरकडे जात होत्या तेव्हा डॉक्टरांना वाटायचं की, मी दारू पिऊन आले.