दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात लवकरच काही विशिष्ट प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉक्टर नव्हे तर रोबो करताना दिसतील, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शस्त्रक्रियांसाठी हे रुग्णालय १८ कोटी रुपये गुंतवणुकीचा यंत्रमानव (रोबोट) विकत घेणार आहे. या रोबोटद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया गरजूंसाठी मोफत असतील तर स्वतंत्र (खासगी) वॉर्ड घेणाऱ्या सधन वर्गाला त्यासाठी निश्चित असे अनुदानीत शुल्क अदा करावे लागेल. सफदरजंग रुग्णालयातील युरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर अनुप कुमार यांनी सांगितले की, तो यंत्रमानव विकत घेण्याची जवळपास सगळी तयारी झाली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत रुग्णालयात हा यंत्रमानव शस्त्रक्रियेद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि इतर किती तरी शस्त्रक्रिया केल्या जातील. डॉ. अनुप यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयात मूत्रपिंड आणि प्रोस्टेट कर्करोगावरील उपचारांसाठी ४-५ लाख रुपये खर्च करावे लागतात, त्यामुळे हा शस्त्रक्रियेचा खर्च नेहमी येतो त्यापेक्षा कमी असेल.
शस्त्रक्रियेसाठी आता यंत्रमानवाचा वापर
By admin | Published: May 06, 2017 1:04 AM