कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या घरी सुरक्षित असले तरी अनेकांची काम रखडली आहेत. एप्रिल मे हा लग्नसंमारंभांचा सिजन असल्यामुळे अनेकांची ठरलेली लग्न पुढे ढकलली आहेत. तर काहीजणांनी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून ऑनलाईन पद्धतीने नियमांचे पालन करत लग्न केलं आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेशात सुद्धा घडली आहे. एक दोन नाही तर १०० किलोमीटर सायकल चालवून हा व्यक्ती आपल्या पत्नीपर्यंत पोहोचला आहे.
१०० किलोमीटर सायकल चालवून बायकोला आणायला गेलेल्या व्यक्तीचं नाव कलकू प्रजापती आहे. यावेळी या व्यक्तीसोबत कोणीही सहकारी नव्हते. एकटाच आपल्या सायकलवरून प्रवास करून महोबा जिल्ह्यात पोहोचला. यांच लग्न २७ एप्रिलला ठरलं होतं. त्यानंतर मित्रांच्या सांगण्यावरून पैथिया जिल्ह्यातील हमीरपूर येथे राहत असलेल्या व्यक्तीने आपली सायकल घेतली आणि पुनिया गावात आपल्या होणाऱ्या बायकोला घ्यायला गेला. ( हे पण वाचा-उशीच्या फॅशननंतर आता स्टायलिश बॅग, फोटो पाहून म्हणाल 'हा' असला कसला स्वॅग...)
पोलीसांची परवानगी नसल्यामुळे कोणालाही सोबत घेऊन न जाता या व्यक्तीने लग्न केले. लग्न झाल्यानंतर आपल्या घरी परतला. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा ध्यानी दास यांच्या आश्रमात रिंकू नावाच्या मुलीसोबत या व्यक्तीने आपला विवाह केला. आपलं लग्न नेहमी लक्षात राहिल असं त्याने सांगितलं आहे. पत्नीला घरी आणल्यामुळे आनंदी असल्याची प्रतिक्रिया या व्यक्तीने दिली आहे. ( हे पण वाचा-आली रे आली! सोशल डिस्टेंसिंगची बाईक आली, फोटो पाहताच व्हायरल झाली...)