बोंबला! वरातीत सोबत नेलं नाही म्हणून मित्राने नवरदेवाला पाठवली 50 लाख रूपयांची नोटीस...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:19 PM2022-06-24T18:19:17+5:302022-06-24T18:19:35+5:30
Uttarakhand : रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली.
Uttarakhand : पत्रिका देऊन लग्नात बोलवल्यानंतरही वरातीत घेऊन न गेल्याने एका मित्राने नवरदेव मित्राला 50 लाख रूपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ऐकायला हे जरा विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वारची आहे. रवि म्हणजे नवरदेवाने आपल्या लग्नाचं कार्ड मित्र चंद्रशेखरला दिलं. चंद्रशेखर तयारी करून वरातील जाण्यासाठी आला, पण त्याआधीच वरात निघून गेली.
चंद्रशेखर नवरदेव मित्र रविसोबत फोनवरून बोलला, तर आपली चूक मान्य करण्याऐवजी सांगितलं की, वरात घेऊन जात आहे. आता तू परत जा. यावेळी तिथे उपस्थित वरातींनी लग्नाचे कार्ड वाटणारा मित्र चंद्रशेखरला खूप काही ऐकवलं. ही बाब चंद्रशेखरच्या मनावर लागली आणि त्याला मानसिक त्रासही झाला.
यावर चंद्रशेखरने आपला वकिल अरूण भदौरियाला संपर्क केला आणि सल्ला घेत अधिवक्त्याच्या माध्यमातून नवरदेव मित्र रविला नोटीस पाठवून 3 दिवसांच्या माफी मागणे आणि नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रूपये देण्याची मागणी केली. असं केलं नाही तर कोर्टात केस दाखल करण्याचा इशाराही दिला.
वकिल अरूण कुमार भदौरिया यांनी सांगितलं की, 23 जूनला हरिद्वारला राहणारे रवि यांचं लग्न बिजनौरच्या अंजूसोबत होतं. नवरदेव रविने मित्र चंद्रशेखरला एक लिस्ट बनवून दिली. त्यातील लोकांना पत्रिका देण्याचं आणि त्यांना लग्नाला बोलवण्याचं काम चंद्रशेखरकडे सोपवलं.
रविच्या सांगण्यावरून चंद्रशेखरने मोना, काका, कन्हैया, छोटू, आकाश इत्यादी सर्वांना लग्नाची पत्रिका दिली आणि आग्रह केला की, 23 जूनला सायंकाळी 5 वाजता लग्नाला जाण्यासाठी तयार रहा. त्यासाठी गाडी तयार आहे. हे सगळे लोक चंद्रशेखरसोबत सायंकाळी 4.50 वाजता ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.
पण तिथे जाऊन समजलं की, वरात तर पुढे गेली. ज्यामुळे चंद्रशेखरने रविला फोन केला तर तो म्हणाला की, आम्ही लोक निघालो आणि आता तुम्ही घरी परत जा. चंद्रशेखर म्हणाला की, त्याच्या सांगण्यावरून जे लोक लग्नाला जाण्यासाठी आले होते, त्या सर्वांना फार वाईट वाटलं आणि त्या सर्वांनी चंद्रशेखरला मानसिक त्रास दिला.
यानंतर चंद्रशेखरने आपले वकील अरूण भदौरिया यांच्या माध्यमातून एका कायदेशीर नोटीस रविला पाठवली. ज्यात तीन दिवसात सार्वजनिकपणे माफी मागण्याची आणि 50 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.