मगरीचं नाव ऐकताच अनेकांना धडकी भरते. कारण मगर एका झटक्यात तुमचा जीव घेऊ शकते. अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये एका मगरीच्या शरीरात 70 नाणी सापडल्या आहेत. ओमाहा झू अॅंन्ड अॅक्वेरिअमला ही नाणी मगरीच्या रूटीन चेकअप दरम्यान सापडलीत. याची माहिती झू कडून इन्स्टा पेजवर शेअर करण्यात आली आहे. झू कडून तीन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात दोन मगरी आहेत. एकात मगरीच्या पोटातून निघालेली नाणी दाखवण्यात आली आहेत.
झू ने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आमच्या पशु चिकित्सकांनी झू मधील मगरीच्या पोटातील काही धातुच्या वस्तूंचा शोध लावला. मगरीला काही समस्या होण्याआधीच ही नाणी बाहेर काढण्यात आल्या. टीमला 70 अमेरिकेन नाणी सापडल्यात.
टीमकडून सांगण्यात आलं की, मगरीला देण्यात आलेल्या ट्रेनिंगच्या मदतीने तिला आधी एनेस्थेटाइज करण्यात आलं जेणेकरून प्रक्रियेदरम्यान आम्ही तिला सुरक्षित ठेवू शकू. तिच्या पोटातून नाणी काढण्यासाठी एका पाईपचा वापर करण्यात आला.
ही पोस्ट काही दिवसांआधी इन्स्टावर शेअर करण्यात आली होती. आतापर्यंत या पोस्टला 5 हजार लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी व्यक्त केलं की, मगरीची तब्येत चांगली आहे हे महत्वाचं आहे.