भारतीय सेनेतील जवान आता बंदुकीसोबतच त्यांच्या बुटांमधूनही दुश्मनांवर गोळ्या झाडू शकणार आहेत. देशाच्या सीमेवर तैनात जवानांना आता आधीच घुसखोरी करणाऱ्यांची माहिती मिळणार आहे. वाराणसीच्या तरूण वैज्ञानिक श्याम चौरसियाने एक असा अनोखा शूज तयार केला आहे ज्याद्वारे २० किलोमीटर परिसरात असलेल्या घुसखोराची माहिती मिळू शकते. हा शूज दुश्मनांवर गोळ्या झाडण्यासोबतच जवानांच्या पायांना गरमही ठेवतो.
शूजमध्ये लावले आहेत सेंसर
तरूण वैज्ञानिक श्याम चौरसियाने सांगितले की, कधी-कधी घुसखोर गपचूप देशात घुसण्याचा प्रयत्न करतात. त्या घुसखोरांपासून सेनेच्या जवानांना सुरक्षा मिळावी यासाठी इंटेलिजन्स शूज तयार केले आहेत. या शूजमध्ये एक विशेष प्रकारचं सेन्सर लावण्यात आलं आहे. याने २० किलोमीटर परिसरात जर कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर शूज व्हायब्रेट होऊन जवानांना अलार्मच्या माध्यमातून संकेत देतात.
९ एमएमची गन
श्याम चौरसियाने इमरजन्सीचा विचार करता या शूजमध्ये २ फोल्डिंग ९ एमएमचे गन बॅरल लावले आहेत. जे गरज पडल्यावर गोळ्याही झाडू शकतात. याने इमरजन्सीमध्ये जवान सुरक्षित राहू शकतील. त्याने हेही सांगितले की, हे शूज रेडीओ फ्रीक्वेन्सी आणि मोबाइल नेटवर्कवरही काम करतात. हे हायटेक शूज ६५० ग्रॅम वजनाचे आहेत. हे शूज रबर आणि स्टीलपासून तयार केले आहेत.
थंडीत पायांना मिळेल उष्णता
हे शूज खरंच खूप खास आहेत. थंडीपासून जवानांच्या पायांची सुरक्षा करण्यासाठी यात एक हीटर लावण्यात आलं आहे. ज्याने त्यांचे पाय गरम राहतील. यात सोलर चार्जिंग सिस्टीमही लावलं आहे. यात स्टीलची चादर, सोलर प्लेट रेडीओ सर्किट, एलइडी लाइट आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिगर लावलं आहे.
शूजच्या दोन्ही बाजूने करता येईल फायर
देशातील जवानांसाठी तयार करण्यात आललेल्या या शूजच्या पुढे आणि मागे दोन्हीकडून दुश्मनांवर गोळ्या झाडता येऊ शकतील. शूज रिमोटच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीवर फायर करतात. याने सीमेवरील जवानांना आणखी चांगली मदत मिळेल.
श्याम चौरसियाने आपल्या या आविष्काराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. त्याने पत्रात लिहिले की, त्याला हे शूज देशाच्या जवानांना समर्पित करायचे आहेत. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय उत्तर मिळतं हे बघणं महत्वाचं ठरेल.