हिंदीत एक फार लोकप्रिय म्हण आहे की, भगवान के घर में देर होती है, लेकिन अंधेर नहीं. पण काही वेळा देव न्याय करण्यात जराही उशीर करत नाही. अशीच एक घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. झालं असं की, मंदिरात चोरी करायला गेलेल्या दोन चोरांना शोधण्यासाठी पोलिसांना कुठेही धावपळ करावी लागली नाही. कारण त्यांना जणू देवानेच शिक्षा दिली असं झालं.
एका रिपोर्टनुसार, छत्तीसगडच्या कोरबामध्ये स्थित मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचा हात दानपेटीमधे अडकला. चोर आणि त्याचा साथीदार हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकदा प्रयत्न करूनही तो हात बाहेर काढू शकला नाही. ही घटना समजली तर लोक म्हणाले की, देवानेच चोरांना शिक्षा दिली. ही घटना हनुमान मंदिरात घडली.
दोन चोर मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरले होते. त्यांनी दानपेटीतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. अशातच दोनपैकी एका चोराचा हात दानपेटीत फसला. बराच प्रयत्न करून ते हात काढू शकले नाही. अशात लोकांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांना लगेच समजले की, हे दोघे चोरी करण्यासाठीच आले आहेत. लोकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दोघेही पकडले गेले.
कोरबा मंदिराच्या दानपेटीमध्ये चोराचा फसलेला हात पाहून लोक हेच म्हणाले की, जसं कराल तसं भराल. चोरांची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम सकाळी सात वाजता घटनास्थळी पोहोचले. इतक्यात चोराने कसेतरी आपले होत दानपेटीतून सोडवले होते. पण लोकांनी बाहेरून मंदिराचं दार बंद केलं होतं. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही चोर नेहरू नगरचे राहणारे आहेत.