शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Video - काय सांगता? ...अन् चक्क बाळासारखा रडू लागला 'हा' पक्षी; आवाज ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 11:39 AM

Video bird crying like baby in australian zoo you will be shocked : प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.

नवी दिल्ली - लहान मुलं रडायला लागली की लगेचच त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला जर कोणी पक्षी लहान बाळासारखा रडतो असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. प्राणीसंग्रहालयातील एक पक्षी चक्क बाळासारखा रडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. पक्ष्याचा आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट ठरला असून अनेकांना तो प्रचंड आवडला आहे. 

सिडनीच्या टॅरोंगा प्राणीसंग्रहालयातील (Taronga Zoo) हे दृश्य आहे. या प्राणीसंग्रहालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी ओरडताना दिसत आहे. पण एखाद्या पक्ष्याच्या ओरडण्यासारखा त्याचा आवाज नाही तर चक्क एका लहान बाळाचा आवाज आहे. तो जेव्हा ओरडतो तेव्हा बाळाचा आवाज येतो. म्हणजेच बाळाच्या रडण्याचा आवाज या पक्ष्याच्या गळ्यातून बाहेर पडतो आहे.

आवाजाची नक्कल करण्यात तरबेज

lyrebird असं या पक्ष्याला म्हटलं जातं. जो वेगवेगळे आवाज काढण्यात म्हणजे आवाजाची नक्कल करण्यात तरबेज असतो. हा पक्षी आवाज बरोबर लक्षात ठेवतो आणि तसा हुबेहुब आवाज काढण्याचा सरावही करतो.  या पक्ष्यानेही कदाचित असाच बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला असावा आणि अगदी तसाच आवाज तो काढतो आहे अशी माहिती प्राणीसंग्रहालयाच्या सुपरवायजरने दिली आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल